agriculture news in marathi, Very little water storage in ponds in the past | Agrowon

कवठेमहांकाळमधील तलावांत अत्यल्प पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

सांगली ः वरुणराजाच्या हुलकावणीमुळे ऐन पावसाळ्यातही कवठेमहांकाळ तालुक्‍यातील अकरा लघुप्रकल्प तलावांपैकी दोन तलाव कोरडे पडले आहेत. तर तीन तलावांत मृत पाणीसाठा आहे. तर उर्वरित सहा तलावांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्‍यातील बळिराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

सांगली ः वरुणराजाच्या हुलकावणीमुळे ऐन पावसाळ्यातही कवठेमहांकाळ तालुक्‍यातील अकरा लघुप्रकल्प तलावांपैकी दोन तलाव कोरडे पडले आहेत. तर तीन तलावांत मृत पाणीसाठा आहे. तर उर्वरित सहा तलावांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्‍यातील बळिराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे गत दोन ते अडीच महिन्यांपासून आवर्तन सुरू आहे. यामुळे या योजनेच्या लाभक्षेत्रातील गावच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. परंतु तालुक्‍यात अजूनदेखील दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तालुक्‍यात तलावात पाणीसाठा अल्प प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढू लागली आहे.

तालुक्‍यात अकरा प्रकल्प आहेत. त्यापैकी कुची, बोरगाव, येथील दोन तलाव कोरडे पडले आहेत. तर रायवाडी, हरोली, बसप्पावाडी हे तीन तलावांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. लांडगेवाडी या तलावात म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी ६५९.९९ दशलक्षघन फूट मीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तर लंगरपेठ या तलावात टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आस्लायने ७५६.८३ दशलक्षघन फूट मीटर पाणी शिल्लक आहे. दरम्यान, म्हैसाळ योजना दोन महिन्यांपासून सुरू आहे. तालुक्‍यातील तलाव म्हैसाळ योजनेच्या आवर्तनातून भरण्यात येतील, अशी आशा शेतकऱ्यांत होती. परंतु अडीच महिने होऊनदेखील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून भरण्यात आले आहेत. तर इतर तलावात पाणी भरण्यासाठी पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले असल्याचे दिसते आहे.

तालुक्‍यातील तलावातील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट मीटरमध्ये)
तलाव पाणीसाठा दशलक्ष
कुची कोरडा
लांडगेवाडी ६५९.९९
लंगरपेठ ७५६.८३
नांगोळे ६३८.४५
बोरगाव कोरडा
दुधेभावी ६२५.५०
घोरपडी ४६.६२
बंडगरवाडी ९७.२५

 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...