agriculture news in marathi, Vidarbha heatwave weakens | Agrowon

विदर्भात उष्णतेची लाट ओसरली, चटका कायम
टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 मे 2018

पुणे : दोन दिवसांपासून विदर्भात वारे वाहत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा काहीसा खाली आल्याने विदर्भातील उष्णतेची लाट ओसरली आहे. मात्र, सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत असल्याने उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे : दोन दिवसांपासून विदर्भात वारे वाहत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा काहीसा खाली आल्याने विदर्भातील उष्णतेची लाट ओसरली आहे. मात्र, सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत असल्याने उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

विदर्भात आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते लक्षद्वीप बेटापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे विदर्भात (गुरुवारी) वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात दुपारनंतर अचानक ढग गोळा होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान सकाळपासून वाऱ्यामुळे उन्हाचा ताप काहीसा कमी झाला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील ब्रह्मपुरी, मराठवाड्यातील परभणी येथे सर्वाधिक ४४.३ अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली आहे.

गेले काही दिवस सातत्याने ४५ अंशांवर असलेल्या चंद्रपूरचा पारा कमी ३९.४ अंशांवर घसरला होता. तर नागपूर येथील तापमानात मोठी घट होत ३७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपुरात सरासरीच्या तुलनेत ३.६ अंश सेल्सिअस, तर नागपुरात ४.१ अंश सेल्सिअसने पारा उतरला आहे. मराठवाड्यात मात्र उष्णतेची तीव्रता टिकून आहे. तेथे कमाल तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रात ३३ ते ४३ अंश सेल्सिअस, कोकणात ३३  ते ३६ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान होते. 

शुक्रवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) ः मुंबई (सांताक्रूझ) ३४.१, अलिबाग ३५.२, रत्नागिरी ३३.१, डहाणू ३५.९, पुणे ३८.४, नगर ४३.०, जळगाव ४२.८, कोल्हापूर ३७.०, महाबळेश्वर ३३.३, , नाशिक ३८.०, सांगली ३९.४, सातारा ४०.१, सोलापूर ४२.७, औरंगाबाद ४०.७, परभणी शहर ४४.३, नांदेड ४३.५, अकोला ४४.०, अमरावती ४२.८, बुलढाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४४.३, चंद्रपूर ३९.४, गोंदिया ४०.८, नागपूर ३७.९, वाशिम ४२.६, वर्धा ४०.९, यवतमाळ ४३.०.

इतर अॅग्रो विशेष
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...
चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...
भाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
स्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...