agriculture news in marathi, Vidarbha may receive rain from tomorrow | Agrowon

विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे संकेत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे विदर्भात उद्यापासून (ता. १६) ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी (ता. १४) जळगाव येथे राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे विदर्भात उद्यापासून (ता. १६) ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी (ता. १४) जळगाव येथे राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील चक्राकार वाऱ्यामुळे शुक्रवारी (ता. १४) पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान होते. परिणामी राज्यात सरासरीच्या खाली आलेले तापमान पुन्हा वाढले आहे. बुधवारी (ता. १२) ८ अंशांपर्यंत घसरलेला पारा शुक्रवारी १० अंशांच्या वर गेला आहे. पावसाला पोषक हवामानामुळे उद्या (ता. १६) विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर राज्याच्या तापमानात चढ-उतार होणार आहेत. 

शुक्रवारी (ता. १४) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १२.४(१), नगर १२.६ (०), जळगाव १०.०(-२), कोल्हापूर १८.७(३), महाबळेश्‍वर १२.३(-१), मालेगाव १२.४ (१), नाशिक १०.४(०), सांगली १५.३(१), सातारा १७.५ (४), सोलापूर १९.३(४), सांताक्रुझ २०.८(२), अलिबाग २०.३(२), रत्नागिरी २०.०(-१), डहाणू १७.०(-१), आैरंगाबाद १४.४(३), परभणी १५.४ (२), नांदेड १७.० (५), अकोला १२.५(-१), अमरावती १४.४(-१), बुलडाणा १२.८ (-२), चंद्रपूर १७.२(३), गोंदिया १३.०(१), नागपूर १३.१(०), वर्धा १६.४(३), यवतमाळ १३.० (-२). 

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत 
बंगालच्या उपसागरात तमिळनाडूलगत शनिवारी (ता. १५) चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यालगत शुक्रवारी (ता. १४) कमी तीव्रतेच्या वादळाची (डीप डीप्रेशन) निर्मिती झाली. भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे सरकत असलेली ही प्राणली तीव्र होत असून, तमिळनाडू, आंध्र प्रदेशालगत सोमवारपर्यंत (ता. १७) तीव्र चक्रीवादळ घोंगावण्याची शक्यता अाहे. यामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातही हलक्या पावसाचा अंदाज आहे.

 

 

इतर अॅग्रो विशेष
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...