पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम पाऊस, थंडीत वाढ

ब्रम्हपूरी (जि. चंद्रपूर) परिसरात पावसाच्या सुरु असलेल्या सरी (छायाचित्र - संतोष डुकरे)
ब्रम्हपूरी (जि. चंद्रपूर) परिसरात पावसाच्या सुरु असलेल्या सरी (छायाचित्र - संतोष डुकरे)

नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा परिणामस्वरुप संपूर्ण पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत काही ठिकाणी रिमझिम पावसास सुरवात झाली आहे. गडचिराली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूरसह नागपूरपर्यंत काही भागात पावसाचा शिडकावा झाला. या पावसामुळे थंडीचा कडका वाढला असून अनेक ठिकाणी गारठ्यापासून वाचण्यासाठी दिवसा शेकोट्या पेटल्या आहेत.  दरम्यान, बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेले ‘पेथाई’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशाच्या सोमवारी (ता. 17) दुपारी किनारपट्टीवर असलेल्या पुर्व गोदावरी जिल्ह्यात धडकले. वादळी वाऱ्यासह अालेल्या मध्यम ते जोरदार पावसामुळे किनारपट्टीय भागातील जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसाने जमीन खचल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला अाहे.

ताशी 80 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह ‘पेथाई’ चक्रीवादळ ‘कात्रेनीकोणा’ येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास धडकल्याचे राज्य सचिवालयाकडून स्पष्ट करण्यात आले. विजयवाडा शहरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जमीन खचून एका नागरीकाचा मृत्यू झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे सांगण्यात आले. वादळामुळे विमान सेवा आणणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील गाड्याच वेळापत्रक कोलमडले आहे. वादळामुळे किनारपट्टीय भागातील शाळांना एक दिवसाची सुट्टी देण्यात आली अाहे. वादळाची तीव्रता ओसरत असून, उद्या (ता.18) आंध्र प्रदेश, ओडीशा, छत्तीसगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com