agriculture news in marathi, Vidhansabha is my target : Raj Thackery | Agrowon

माझे लक्ष्य विधानसभा निवडणूक : राज ठाकरे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

मुंबई : लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे मी यापूर्वीच सांगितले होते. जे माझ्या मनात आहे, हे लोकांना सांगण्यासाठी मी सभा घेत आहे. गेल्या पाच वर्षांत लोकांनी जे भोगले ते लोकांपर्यंत पोचविले. माझे लक्ष्य हे विधानसभा निवडणूक आहे, त्या वेळी मी माझे उमेदवार उभे करेन, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

बीबीसी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण दिले. भाजप-शिवसेनेला मतदान करू नका, हा माझा स्पष्ट उद्देश आहे. त्याला फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होत असेल तर होऊ द्या, असे राज यांनी स्पष्ट केले.

मुंबई : लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे मी यापूर्वीच सांगितले होते. जे माझ्या मनात आहे, हे लोकांना सांगण्यासाठी मी सभा घेत आहे. गेल्या पाच वर्षांत लोकांनी जे भोगले ते लोकांपर्यंत पोचविले. माझे लक्ष्य हे विधानसभा निवडणूक आहे, त्या वेळी मी माझे उमेदवार उभे करेन, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

बीबीसी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण दिले. भाजप-शिवसेनेला मतदान करू नका, हा माझा स्पष्ट उद्देश आहे. त्याला फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होत असेल तर होऊ द्या, असे राज यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे म्हणाले, ''''मी जेव्हा काँग्रेसविरोधात बोलत होतो तेव्हा यांना गुदगुल्या होत होत्या. आता यांना उघडे पाडायला सुरवात केल्यानंतर त्यांना वाईट वाटत आहे. काँग्रेसविरोधात बोलताना मला भाजपने सुपारी दिली होती का? मी घेत असलेल्या सभांचा खर्च मनसे करत आहे. आमच्या खर्चाबद्दल बोलण्याचा मुख्यमंत्री किंवा इतर नेत्यांना बोलण्याचा अधिकार नाही. भाजप एवढा खर्च कोठून करते याचा हिशोब देतील का? तुम्ही मारलेल्या थापा मोजा, माझा खर्च मोजायला कशाला जाताय? मला यांच्यासारखी भाड्याने माणसे आणावी लागत नाहीत. माझा विरोध नरेंद्र मोदी-अमित शहा या जोडीला आहे. देवेंद्र फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते जे सांगतात ते हे करतात. नोटाबंदी, जीएसटी याबद्दल यांनी आता बोलावे. सीबीआयमध्ये अधिकाऱ्यांमध्ये भांडणे होतात, न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागते, आरबीआयच्या गव्हर्नरला राजीनामा द्यावा लागतो, हे यापूर्वी ऐकले आहे का? मी गुजरात दौऱ्यावर गेल्यावरही म्हटले होते, महाराष्ट्र नंबर एकच आहे.’’ 

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...