विदर्भातील शेतकऱ्यांचे पंढरपुरात आंदोलन

विदर्भातील शेतकऱ्यांचे पंढरपुरात आंदोलनविदर्भातील शेतकऱ्यांचे पंढरपुरात आंदोलन
विदर्भातील शेतकऱ्यांचे पंढरपुरात आंदोलनविदर्भातील शेतकऱ्यांचे पंढरपुरात आंदोलन

पंढरपूर, जि. सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याने राज्यभरात विरोधकांचा सरकारविरोधी हल्लाबोल सुरू असतानाच आता मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातील नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. ५) पंढरपुरात सरकारविरोधात आंदोलन केले. शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कापसावरील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे, यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी विदर्भवासीय शेतकऱ्यांनी व गुरुदेव सेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट विठ्ठलालाच आंदोलनाच्या माध्यमातून साकडे घातले. शेतकरी कर्जमाफीचा उडालेला गोंधळ आणि शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यामुळे राज्यात सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अशातच मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारविरोधी धार आणखी तीव्र करण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीने पुन्हा हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील जनतेमध्ये सरकारविरोधी भावना तयार होऊ लागली आहे. अशातच  विदर्भातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारल्याने या आंदोलनाला विशेष महत्त्व आले आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, शेतीमालाला हमीभाव मिळावा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यांसह इतर प्रमुख मागण्या घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकरी पंढरपुरात विठू दरबारात येऊन धडकले. भाजप सरकारला विठ्ठलाने आता तरी सुबुद्धी द्यावी, असे साकडे या शेतकऱ्यांनी विठुरायाला घातले.  विदर्भातून आलेल्या शेतकरी आणि महिलांनी सकाळी नामदेव पायरीजवळ काही वेळ थांबून सरकारविरोधी घोषणा देऊन भाजप सरकारबद्दल असलेला आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर महाद्वार ते शिवाजी चौकापर्यंत शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात मोर्चा काढला. त्यानंतर शिवाजी चौकात जाहीर सभा झाली. या वेळी गुरुदेव सेनेचे अध्यक्ष संदीप भोयर यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा पाढा वाचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.  या आंदोलनामध्ये शेतकरी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातून शेतकऱ्यांनी या पद्धतीने थेट विठ्ठलाला साकडे घातल्याने हे आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com