agriculture news in marathi, Vidharbha to have scattered rainfall till thursday | Agrowon

विदर्भात गुरुवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 मे 2018

पुणे : गेले काही दिवस उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळणाऱ्या विदर्भाला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत (ता. १७) विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असली तरी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सोमवारी (ता. १४) मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पुणे : गेले काही दिवस उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळणाऱ्या विदर्भाला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत (ता. १७) विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असली तरी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सोमवारी (ता. १४) मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

विदर्भामध्ये एप्रिल महिन्यात आलेली उष्णतेची लाट मे महिन्यातही कायम असून, चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह अनेक ठिकाणी सातत्याने ४४ ते ४५ अंशांच्या आसपास तापमानाची नोंद होत आहे. उन्हाच्या झळांनी होरपळणाऱ्या विदर्भात शनिवारी (ता. १२) दुपारनंतर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाने हजेरी लावली. दरम्यान ढगाळ हवामानामुळे तापमानात एक ते दोन अंशांची घट झाल्याचे दिसून आले. विदर्भात गुरुवारपर्यंत हलका पाऊस पडण्याचा, तर उर्वरित महाराष्ट्रात मंगळवारपासून (ता. १५) मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. 

अरबी समुद्राच्या अाग्नेय भागात २.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, त्यांच्या प्रभावामुळे मंगळवारी (ता. १५) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत अाहेत. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमानाचा पारा ४४ अंशांच्या वर होता. 

रविवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.८, जळगाव ४३.४, कोल्हापूर ३२.५, महाबळेश्वर ३१.८, मालेगाव ४३.२, नाशिक ३६.८, सांगली ३५.२, सातारा ३७.९, सोलापूर ४२.०, मुंबई ३४.०, अलिबाग ३६.४, रत्नागिरी ३२.६, डहाणू ३५.६, औरंगाबाद ४१.४, परभणी ४५.६, नांदेड ४४.०, अकोला ४५.१, अमरावती ४४.८, बुलडाणा ४१.०, ब्रह्मपुरी ४५.१, चंद्रपूर ४६.६, गोंदिया ४३.३, नागपूर ४५.३, वर्धा ४५.९, यवतमाळ ४५.०.

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...