agriculture news in marathi, Vidharbha, Marathwada faces temperature rise | Agrowon

विदर्भ, मराठवाड्यात तापमान ४२ अंशांवर
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 एप्रिल 2018

पुणे : राज्यात तापमान वाढतच असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा चटका अधिक आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे, तर मालेगाव, भिरा, परभणी, नांदेड, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे ४२ अंश तापमानाची नोंद झाली. राजस्थानमधील बारमेर येथे देशातील सर्वोच्च ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

पुणे : राज्यात तापमान वाढतच असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा चटका अधिक आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे, तर मालेगाव, भिरा, परभणी, नांदेड, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे ४२ अंश तापमानाची नोंद झाली. राजस्थानमधील बारमेर येथे देशातील सर्वोच्च ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटक, तामिळनाडू, कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा होता. त्यामुळे शनिवारी दुपारनंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान झाले होते. उन्हाच्या चटक्याबरोबरच उकड्यातही वाढ झाली होती. मंगळवारपर्यंत (ता.३) तापमान वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शनिवारी (ता. ३१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, जळगाव ४१.६, कोल्हापूर ३७.३, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४२.०, नाशिक ३९.०, सांगली ३९.०, सातारा ३८.५, सोलापूर ४१.४, मुंबई ३२.२, अलिबाग ३४.५, रत्नागिरी ३१.४, डहाणू ३२.८, भिरा ४२.०, आैरंगाबाद ३९.६, परभणी ४२.६, नांदेड ४२.०, अकोला ४२.५, अमरावती ४१.२, बुलडाणा ३९.६, ब्रह्मपुरी ४२.१, चंद्रपूर ४२.५, गोंदिया ४०.३, नागपूर ४१.०, वर्धा ४२.०, यवतमाळ ४२.०.

इतर अॅग्रो विशेष
उगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...
...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...
खरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...
दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...