agriculture news in marathi, Vidharbhas minimum temperature decreases by 5 degrees | Agrowon

विदर्भात किमान तापमानात ५ अंशांपर्यंत घट
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017

पुणे  ः उत्तर भारतातील राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात थंडीचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम लगतच्या विदर्भात दिसू लागला असून, किमान तापमानात पाच अंशांपर्यंत घट झाली आहे. रविवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील नागपूर येथे १०.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   

पुणे  ः उत्तर भारतातील राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात थंडीचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम लगतच्या विदर्भात दिसू लागला असून, किमान तापमानात पाच अंशांपर्यंत घट झाली आहे. रविवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील नागपूर येथे १०.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   

कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हवामान ढगाळ असल्याने थंडीत चढउतार होत आहे. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे असल्याने थंडी हळूहूळू वाढू लागली आहे. सध्या राज्यातील बहुतांशी भागांत सायंकाळी हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे रात्रीचा किमान तापमानाचा पारा खाली उतरत आहे. परंतु पहाटे चांगलाच गारवा तयार होत असल्याने गुलाबी थंडीने नागरिकांना हुडहुडी भरीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक गरम ऊब मिळविण्यासाठी थंड पडलेल्या शेकोट्या हळूहळू पेटवू लागले आहेत. सध्या राज्यातील बहुतांशी भागांत किमान तापमान चार ते पाच अंशांपर्यंत घटले आहे. राज्यात हवामान कोरडे असल्याने थंडी वाढू लागली आहे.

कोकणात काही भागांत किमान तापमान सरासरीएवढेच होते. तर अलिबाग, भिरा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने वाढ झाली होती. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली. तर जळगाव,  सातारा, नाशिक, सांगली, सातारा येथील किमान तापमान सरासरीएवढेच होते. तर सोलापूरमधील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घटले.

मराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक ४ अंश सेल्सिअसने घट होऊन ११.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली.औंरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद येथील किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. उस्मानाबादमध्ये सर्वांत कमी म्हणजेच १०.४ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भातील गोंदिया, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसने घट झाली. नागपुरात ४ अंशांनी घट झाली. उर्वरित अकोला, अमरावती, बुलडाणा येथे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने घटले.

रविवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट ः अंश सेल्सिअसमध्ये : मुंबई २०.२, अलिबाग २१.२ (१), रत्नागिरी २१.३, डहाणू २१.१ (१), भिरा १९.५ (१), पुणे १४.२ (१), जळगाव १३.६, कोल्हापूर १९.३ (२), महाबळेश्वर १९.३ (२), मालेगाव १४.६ (१), नाशिक १२.५, सांगली १६.६, सातारा १६.०, सोलापूर १४.५ (-३), उस्मानाबाद १०.४, औरंगाबाद १३.४, परभणी ११.६ (-४), नांदेड १४.५, अकोला १३.५ (-२), अमरावती १३.४ (-३), बुलडाणा १४.० (-२), चंद्रपूर १५.६, गोंदिया १०.६ (-५), नागपूर १०.४ (-४), वर्धा ११.०(-५), यवतमाळ ११.४ (-५).  

इतर अॅग्रो विशेष
जमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी?जी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...
पंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...
करवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...
पशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे  : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...
कृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...
कांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...
उन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...
तंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...
‘चंद्र’पूर तापलेलेच ! ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...
ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...
धुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे  ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...
बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...
ठरलं...दूध फुकट घालायचं ! लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...
तूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...
योग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...
भिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...
अंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...
रोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...
साखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...
‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...