agriculture news in Marathi, vidhyadhar anaskar says, District bank will get loan on NABARD rate, Maharashtra | Agrowon

नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना पीककर्ज देणार : विद्याधर अनास्कर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या पीककर्जाच्या व्याजदरानेच यापुढे राज्य बँकेकडूनही जिल्हा बँकांना पीककर्ज उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. 

मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या पीककर्जाच्या व्याजदरानेच यापुढे राज्य बँकेकडूनही जिल्हा बँकांना पीककर्ज उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. 

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडी-अडचणींसंदर्भात राज्य सहकारी बँकेने नुकतीच राज्यातील सर्व जिल्हा बँकांची एक दिवसीय परिषद घेण्यात आली. या परिषदेला राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी, नाबार्डचे उपसरव्यवस्थापक डी. के. गवळी, कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी मंत्री हसन मुश्रीफ, अकोला जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे आदींसह राज्यातील जिल्हा बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. 

या वेळी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर म्हणाले, की राज्य बँकेच्या व्यवसायात जिल्हा बँका हा महत्त्वाचा घटक आहे. त्रिस्तरीय पतरचनेत जिल्हा बँकांचे महत्त्व ओळखून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य बँक आग्रही आहे. या परिषदेपूर्वी राज्य बँकेने राज्यातील सर्व जिल्हा बँकांच्या अडचणी लेखी स्वरूपात मागवून राज्य शासनाशी संबंधित असलेल्या अडचणी, राज्य शासनास पाठविल्या. तसेच नाबार्डशी संबंधित असलेल्या अडचणी परिषदेपूर्वी नाबार्डकडे पाठविल्या आहेत. राज्य बँकेशी संबंधित असलेल्या विविध अडचणींवर विचार केल्यानंतर त्या संबंधीचे निर्णय व उपाययोजना या परिषदेमध्ये जाहीर केल्या आहेत. 

राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या पीककर्जाच्या व्याजदरानेच राज्य बँकेने जिल्हा बँकांना कर्ज वितरीत करावे, अशी जिल्हा बँकांची प्रमुख मागणी होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून, राज्य बँकेला नाबार्ड ज्या दराने पीककर्ज देईल त्याच व्याजदराने जिल्हा बँकांना पीककर्ज उपलब्ध करून दिले जाईल, असा निर्णय घेण्यात आला. तसेच शासन स्तरावरील व नाबार्ड स्तरावरील जिल्हा बँकांच्या अडचणींबाबत सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी व नाबार्डचे उपसरव्यवस्थापक डी. के. गवळी यांनीदेखील जिल्हा बँकांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.

परिषदेमध्ये झालेले निर्णय
पगारदार नोकरदारांच्या संस्थांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा करणे, जिल्हा बँकांना एनपीएच्या निकषावर आधारित फेरकर्जपुरवठा यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे, ठेवीवरील कर्ज मर्यादा ९० टक्क्यांपर्यंत वाढविणे, मुदतपूर्व कर्जभरणा केल्यास त्यावर दंडव्याज न आकारणे, कर्जाशी निगडित ठेव पातळीच्या निकषामध्ये सुसूत्रता आणणे, विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा बँकांना मदत करणे, जिल्हा बँकांना व्याजपरतावा वेळेत मिळण्यासाठी राज्य बँकेच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करणे, सीबीएस प्लॅटफॉर्मवर विविध सुविधा व सेवा जिल्हा बँकांना अत्यल्प दरात उपलब्ध करून देणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय या परिषदेमध्ये घेण्यात आले.

असे मिळते कर्ज
सध्याच्या दरानुसार नाबार्ड राज्य बँकेला ४.५० टक्के व्याजदराने पीक कर्ज देते. राज्य बँक जिल्हा बँकांना अर्धा टक्का अधीक, म्हणजेच ५ टक्के दराने कर्जपुरवठा करते. आता राज्य बँक नाबार्डच्या व्याजदरावर घेत असलेले अधीकचे अर्धा टक्का व्याज घेणार नाही. नाबार्ड ज्या व्याजदराने राज्य बँकेला कर्ज देईल त्याच दराने राज्य बँक जिल्हा बँकांना कर्जपुरवठा करणार आहे. यामुळ राज्य बँकेचे ३० कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होणार आहे. 

इतर अॅग्रो विशेष
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...