agriculture news in Marathi, vidyadhar anaskar says, state bank got 316 crore profit, Maharashtra | Agrowon

राज्य बँकेला ३१६ कोटींचा नफा: विद्याधर अनास्कर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 मे 2019

मुंबई: राज्यातील जिल्हा बँकांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने संपलेल्या आर्थिक वर्षात गरुडभरारी घेतली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये बँकेला ढोबळ नफा ५६३ कोटी तर ३१६ कोटींचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी गुरुवारी (ता. १६) दिली. 

मुंबई: राज्यातील जिल्हा बँकांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने संपलेल्या आर्थिक वर्षात गरुडभरारी घेतली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये बँकेला ढोबळ नफा ५६३ कोटी तर ३१६ कोटींचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी गुरुवारी (ता. १६) दिली. 

राज्य बँकेने शेजारील कर्नाटक, आंध्रा आणि गुजरात राज्य सहकारी बँकांच्या एकत्रित व्यवसायाइतकी उलाढाल एकाच वर्षात करून हा उच्चांक गाठल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य संजय भेंडे, अविनाश महागावकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख उपस्थित होते. 

अनास्कर पुढे म्हणाले, की राज्य बँकेला यंदा १०७ वर्षे पूर्ण झाली आहेत. सरलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी १५,८४० कोटी, कर्जे १९,७०० कोटी आणि एकूण व्यवसाय ३५,५४० कोटी इतका झाला आहे. बँकेच्या स्वनिधीतही भरभक्कम वाढ झाली आहे. बँकेचा स्वनिधी ४,००४ कोटींवर पोचला आहे. सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाकडून थकहमी पोटी मिळणाऱ्या १,०४९ कोटींमुळे स्वनिधी ५,००० कोटींवर जाणार आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार ४,००० कोटींच्या वर नेटवर्थ असलेल्या बँकांना शासकीय व निमशासकीय संस्थांकडून ठेवी स्वीकारता येणार आहेत. 

संपलेल्या आर्थिक वर्षात बँक ऑफ महाराष्ट्र या व्यापारी बँकेचा स्वनिधी ५,७३९ कोटी इतका होता. त्याखालोखाल राज्य बँकेचा स्वनिधी ५,००० कोटी इतका होत असल्याने नाबार्डच्या परवानगीने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी व्यापारी बँकांच्या समवेत सहभाग कर्ज योजनेत सहभागी होण्याचा निर्णय राज्य बँकेने घेतला आहे. त्यासोबत आगामी काळात बँक रिटेल बँकिंग क्षेत्रातही उतरणार आहे. आर्थिक वर्षात बँकेने एकाही बुडीत कर्जाचे निर्लेखन केलेले नाही असेही त्यांनी सांगितले. 

प्रशासक अस्तित्वात येण्यापूर्वी बँकेचा तोटा सुमारे १,१०० कोटींइतका होता. गेल्याकाळात हा तोटा भरून काढत बँकेने चमकदार कामगिरी केली आहे. यंदा बँकेने ५६३ कोटी इतका ढोबळ नफा कमावला आहे. तर निव्वळ नफा ३१६ कोटींवर पोचला आहे. गेल्यावर्षी २०१ कोटी निव्वळ नफा होता. त्यात यंदा भरीव वाढ झाली आहे. चालू वर्षात सात नव्या शाखा सुरू करणार आहे. जळगाव, उस्मानाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि यवतमाळ व वर्धा याठिकाणी या शाखा सुरू केल्या जाणार आहेत. तसेच अडचणीतील वर्धा, नागपूर आणि बुलडाणा या जिल्हा बँका चालविण्यास घेण्याचा राज्य बँकेचा प्रयत्न आहे. यासंदर्भातील प्रस्ताव नाबार्डला पाठविण्यात आल्याचेही अनास्कर यांनी सांगितले. 

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांकडे बँकेची सुमारे २,३०० कोटींहून अधिकची थकबाकी आहे. सर्वोच्च न्यायालयातील दाव्यानंतर त्यापैकी १,०४९ कोटी थकहमी राज्य शासनाकडून बँकेला मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपये बँकेला प्राप्त झाले आहेत. थकबाकीची उर्वरित रक्कमही टप्प्याटप्प्याने बँकेला मिळेल, असा विश्वास अनास्कर यांनी व्यक्त केला. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात अवसायनातील सात सहकारी साखर कारखाने भाडेपट्टीने चालविण्यास देऊन देणे वसूल करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकल्याचे त्यांनी सांगितले. 

येत्या काळात राज्य बँकेकडून राज्यात सहकार विद्यापीठ सुरू करण्याचा विचार असल्याचे अनास्कर यांनी सांगितले. या माध्यमातून सहकारी संस्थांमधील सभासद, संचालक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याद्वारे सहकार चळवळ बळकट करण्याचे बँकेचे प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सोने तारण कर्ज पीककर्ज दाखवून
व्यापारी बँकांची बनवाबनवी

राज्यातील काही व्यापारी बँका शेतकऱ्यांना सात टक्के व्याजावर सोनेतारण कर्ज देतात, त्यासाठी शेतकऱ्यांकडून सातबारा उतारा घेतला जातो. सातबाराच्या आधारे संबंधित बँकांकडून हे कर्ज पीककर्ज दाखवले जाते. पीककर्जाला राज्य आणि केंद्र शासनाकडून साडेचार टक्के व्याज सवलत मिळते. ही व्याज सवलत शेतकऱ्याला न देता संबंधित बँकाच लाटत असल्याचे निदर्शनाला आले आहे. व्यापारी बँकांच्या या बनवेगिरीविरोधात राज्य सहकारी बँक जोरदार मोहीम उघडणार असल्याचे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईसाठी राज्य शासनाकडे तक्रारही केली जाणार आहे.

 

इतर बातम्या
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
दोन्ही शिंदेंना आत्मविश्वास नडला सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
सांगोला साखर कारखाना राज्य बँकेच्या...सोलापूर : सांगोला सहकारी साखर कारखाना राज्य...
‘कृष्णे’च्या पाणीपातळीत घटसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला पाणीपुरवठा...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
बुलडाण्यात मागणी आल्यास तत्काळ टँकर...बुलडाणा  : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
वऱ्हाडात विद्यमान खासदारांनाच पुन्हा...अकोला ः लोकसभा निवडणुकीच्या निकालात गुरुवारी (ता....
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
नाशिकला हेमंत गोडसे रिपीट, तर डॉ. भारती...नाशिक : नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
निविष्ठांची तस्करी रोखण्यासाठी...यवतमाळ ः गेल्या वर्षीच्या अनुभवातून बोध घेत...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...
पुण्यातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न...पुणे  ः येत्या पाच वर्षांत पुण्याचा...
निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते...सातारा  ः देशात नरेंद्र मोदी यांच्या...