agriculture news in marathi, vidyadhar anasker says, co-operative banks will bring together, Maharashtra | Agrowon

सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार : विद्याधर अनास्कर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून, अडचणीतल्या सहकारी संस्थांचे पालकत्व घेत राज्य सहकारी बॅंक सर्व सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी शुक्रवारी (ता. १९) पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून, अडचणीतल्या सहकारी संस्थांचे पालकत्व घेत राज्य सहकारी बॅंक सर्व सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी शुक्रवारी (ता. १९) पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

या वेळी मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, संजय भेंडे, विशेष कार्य अधिकारी अजित देशमुख, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक राजेश बायस उपस्थित हाेते. श्री. अनास्कर म्हणाले, की राज्याला सहकाराची पंरपरा लाभली आहे. मात्र अनिष्ट प्रथा  आणि कार्यपद्धतींमुळे सहकार क्षेत्र बदनाम झाले आहे. 
सहकार क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी पुण्यातील गुलटेकडी येथील भूविकास बॅंकेच्या     इमारत खरेदीचा सर्वाधिक २५ काेटी २० लाखांच्या बाेलीचा प्रस्ताव अवसायक आनंद कटके यांना सादर केला आहे. 

तसेच सहकाराच्या प्रशिक्षण, प्रचार, प्रसिद्धीसाठी सहकार संवर्धन निधी उभारण्यात येणारआहे. प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध हाेण्यासाठी थेट विकास साेसायट्यांना राज्य सहकारी बॅंक कर्ज देणार असून, त्यासाठीचा प्रस्ताव नाबार्डला देण्यात आला आहे. तर ५ हजार विकास साेसायट्यांच्या सक्षमीकरणासाठी संगणकीकरण करण्यात येणार आहे. तसेच अडचणीतील नागरी सहकारी बॅंका बंद न करता इतर बॅंकामध्ये विलीनीकरण करुन घेण्यासाठी उपविधीमध्ये बदल करण्यात आले असून, याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.

अडचणीतील जिल्हा बॅंकेचे पालकत्व घेणार असून, काळ्या यादीतील १८ सूतगिरण्यांची कर्ज खाती नियमित केली आहेत. तर बंद पडलेले ६ साखर कारखाने २० वर्षांच्या कराराने चालविण्यास देण्यात आले असून, आणखी ११ कारखाने चालविण्यास देण्यात येणार आहे. तसेच राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने केवळ संस्थांना कर्ज देत आहे. मात्र ही बॅंक आता रिटेल बॅकिंगमध्ये उतरणार असून, तसा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. अनास्कर यांनी या वेळी दिली. 

शेतकऱ्यांच्या मुलांना व्यावसभिमुख शिक्षणाबराेबरच उद्याेग उभारण्यासाठीदेखील राज्य सहकारी बॅंक कर्ज देणार आहे. तशी याेजना तयार करण्यात येणार असल्याचेही अनास्कर यांनी या वेळी सांगितले. 

एकरकमी कर्ज परतफेड याेजना 
३१ मार्च २०१८ अखेर जी खाती अनुत्पादक कर्जाच्या संशयित वर्गवारीत समाविष्ट केलेली असतील, अशा सर्व खात्यांना एकरकमी कर्ज परतफेड याेजना लागू असणार आहे. तर कर्ज परतफेड करताना ज्या दिवशी अनुत्पादक झाले आहे. त्या दिवशीच्या लेजर बॅलन्सच्या मुद्दल अधिक व्याजाच्या १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. आजी - माजी संचालकांंना व त्यांच्याशी हितसंबध असणाऱ्या भागिदारी, संस्थांना दिलेले कर्जे, संचालकांच्या कुटुंबातील व्यक्तींना (पती, पत्नी, आई, वडील, बहीण, मुलगा, मुलगी, जावई किंवा सून) दिलेली कर्जे अपात्र असतील, असे अनास्कर यांनी स्पष्ट केले.

इतर अॅग्रो विशेष
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...