agriculture news in Marathi, vidyasagar rao says, watershed management will be success only through public contribution, Maharashtra | Agrowon

लोकसहभागातूनच जलसंधारण यशस्वी होईल : विद्यासागर राव
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

मुंबई : यंदा राज्याच्या काही भागांत पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वाचविता येईल याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. लोकसहभागातूनच जलसंधारणाची चळवळ यशस्वी होऊ शकेल तसेच लोकसहभागातूनच गावे सुजलाम, सुफलाम होतील, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. 

मुंबई : यंदा राज्याच्या काही भागांत पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वाचविता येईल याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. लोकसहभागातूनच जलसंधारणाची चळवळ यशस्वी होऊ शकेल तसेच लोकसहभागातूनच गावे सुजलाम, सुफलाम होतील, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. 

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्था आणि गुणवंत अधिकारी व कर्मचारी गौरव समारंभ रवींद्र नाट्य मंदिर येथे शुक्रवारी (ता. २६) झाला. त्या वेळी ते बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले की, महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यामुळे राज्याच्या पंचायत राज संस्थांमध्ये महिला प्रतिनिधींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. महाराष्ट्रात अनुसूचित क्षेत्रात पेसा कायद्याची अंमलबजावणी चांगली होत आहे. त्या ठिकाणी तेंदू, मध, बांबू यांच्या संकलन आणि विक्रीचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. गाव समृद्ध झाले तरच देश समृद्ध होईल. यासाठी शेतीला उद्योगधंद्याची जोड दिली पाहिजे. ‘महालक्ष्मी सरस’ हे केवळ वार्षिक प्रदर्शन न राहता तो लघुउद्योग झाला पाहिजे.  

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासन ग्रामविकासावर मोठा भर देत आहे. राज्यात विविध आवास योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते अडीच लाख घरांचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय जागा नसलेल्या ग्रामस्थांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी अनुदान देण्यात येत आहे. शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व योजनांमधून संपूर्ण महाराष्ट्र राज्य बेघरमुक्त करण्याचे स्वप्न साकार होत आहे.

सांगली जिल्हा परिषद प्रथम 
सांगली जिल्हा परिषदेला २५ लाख रुपयांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अनुक्रमे सिंधुदुर्ग आणि अमरावती जिल्हा परिषदेला प्रदान करण्यात आला. या जिल्हा परिषदांना अनुक्रमे १७ लाख आणि १५ लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंचायत समित्यांचे राज्यस्तरीय प्रथम ३ पुरस्कार हे भंडारा (जि. भंडारा), कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) आणि शिराळा (जि. सांगली) यांना अनुक्रमे १७ लाख, १५ लाख आणि १३ लाख रुपयांचे प्रदान करण्यात आले. अनिल देवकाते, आनंद भंडारी, परीक्षित यादव, विजय चव्हाण यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय विविध विभागस्तरीय पुरस्कारांचेही या वेळी वितरण करण्यात आले. आदर्श ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी पुरस्कारही या वेळी प्रदान करण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...