agriculture news in marathi, The 'Vighan' of marigold rates also remained in Ganeshotsav | Agrowon

झेंडूच्या दराचे ‘विघ्न` गणेशोत्सवातही कायम
राजकुमार चौगुले
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

सध्या दादर बाजारात पुणे परिसरातील फूल उत्पादक पट्यातून झेंडूच्या फुलांची आवक होत आहे. यामुळे गणेशोत्सवात तरी काही दिवस झेंडूला उच्चांकी दर मिळेल ही आशा फोल ठरली आहे.
- भरतेश खवाटे, संचालक, श्री शेतकरी फुले व भाजीपाला संघ, कोथळी, जि. कोल्हापूर

गेल्या चार महिन्यांपासून झेंडूचे मार्केट खूपच खालावले आहे. गणेशोत्सवासाठी पश्‍चिम महाराष्ट्राबरोबर बाहेरूनही झेंडू येत असल्याने दादर मार्केटला फुलांची आवक वाढली आहे. यामुळे दर वाढणे अशक्‍य बनले आहे.
- सचिन लोखंडे, व्यापारी, दादर फूल मार्केट

कोल्हापूर : झेंडूच्या घसरत्या दराला गणेशोत्सवातही फारसे तारले नसल्याची स्थिती आहे. प्रचंड मागणी असलेल्या गणेशोत्सव काळातही झेंडूला किलोला केवळ ३० ते ४० रुपये इतका मर्यादित दर मिळत असल्याने झेंडू  उत्पादकांचा पूरता अपेक्षा भंग झाला आहे. दादरच्या फुलबाजारात जुन्नर, नाशिक, नारायणगाव आदी ठिकाणांहूनही फुलांच्या आवकेत वाढ झाली आहे. यामुळे झेंडूच्या दराचे ‘विघ्न` गणेशोत्सवातही कायम असल्याचे चित्र आहे.

निराशादायक हंगाम
जुलै महिन्यापर्यंत फारशी मागणी नसल्याने झेंडूचे दर मंदीतच होते. ऑगस्टच्या मध्यापर्यंत दर दहा ते पंधरा रुपये प्रतिकिलो राहिले. आॅगस्टनंतर राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे राज्यभरातील फुलांचे नुकसान झाले. अचानक आवक कमी झाल्याने दरात काही काळ वाढ झाली. ऑगस्ट अखेरपर्यंत ४० ते ५० रुपये दर होते.

दरात फारसा उठाव नाही
गणेशोत्सवामध्ये मुंबईत झेंडूची मागणी वाढते. यामुळे दर चांगले रहातील, असा कयास उत्पादकांबरोबर फुल विक्रेत्यांचाही होता. परंतु, सप्टेंबरच्या सुरवातीपासून दरात पडझड सुरू झाली. गणेशोत्सव सुरू होण्याच्या अगोदर चार दिवसांपर्यंत झेंडूची विक्री किलोस २० ते २५ रुपयांनी झाली. गणेशोत्सवासाठी मागणी सुरू झाल्यानंतर उत्पादकांनी फुलांची काढणी वेगाने सुरू केली. परंतु, दादरच्या बाजारात राज्यातील फूल उत्पादक पट्यातून फुलांची आवक सुरू झाल्याने आवक वाढलेलीच दिसली. सध्याचे दरच दिवाळीपर्यंत कायम राहू शकतील, अशी शक्‍यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.

इतर ताज्या घडामोडी
शिवकुमार स्वामी यांचे १११व्या वर्षी...बंगळूर : तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख,...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिरपुणेः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
...तर भविष्यात निवडणुका होणारच नाहीत :...कासेगाव, जि. सांगली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात...येवला, जि. नाशिक : यंदा दुष्काळाच्या माहेरघरांसह...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक टाळण्यासाठी...सांगली ः  दादा... द्राक्षांची विक्री करताना...
पंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासाश्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील...
शेवगाव, वैजू बाभूळगाव येथे लोकसहभागातून...नगर   ः दुष्काळाने होरपळ सुरू असताना...
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले ज्ञान...बारामती, जि. पुणे  ः ज्याप्रमाणे...
पुणे विभागात ४२६२ शेततळ्यांची कामे पूर्णपुणे  ः दुष्काळी स्थितीत फळबागा, पिकांसाठी...
फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा ः धनंजय...वरवट बकाल, जि. बुलडाणा   ः भाजप सरकारने...
कृषिक प्रदर्शनाला दिली दोन लाखांवर...बारामती, जि. पुणे  ः गेल्या चार दिवसांत दोन...
सरकारचे अपयश लोकांसमोर प्रभावीपणे...नगर   ः सरकार कामे करण्यापेक्षा घोषणा...
रस्ते विकासासाठी ३० हजार कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यात रस्ते विकासाचा भरीव...
प्रकाश संश्लेषणातून जीएम भात उत्पादनात...भात पिकामध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया...
मराठवाड्यातील पाणीसाठे तळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...