agriculture news in marathi, Vijay Jawandhia demands separate policy for cotton | Agrowon

साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे : विजय जावंधिया
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 मार्च 2018

पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें.िद्रत करून धोरण ठरवावे, तसेच कापसाच्या आयतीवर १०० टक्के कराची आकारणी करावी, अशी मागणाी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें.िद्रत करून धोरण ठरवावे, तसेच कापसाच्या आयतीवर १०० टक्के कराची आकारणी करावी, अशी मागणाी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

जावंधिया यांच्यासह शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठविले आहे. २०११ मध्ये जागतिक बाजारात कापसाच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली होती. त्या वेळी प्रति पाैंडसाठी २ डाॅलर ४७ सेंट दर होते. तर, भारतातील शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ६००० रुपयांपेक्षा दर मिळाला होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कापसाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर काही दिवसांतच निर्यात बंदी हटविण्यात आली; मात्र अमेरिकेतील बाजारात मंदी आली होती.

कापसाचे दर वाढले त्या वेळी भारतीय व्यापाऱ्यांनी कापडाचे दर वाढविले, मात्र कापसाचे दर कमी झाल्यानंतर कापडाचे दर कमी केले नव्हते. आज कापसाच्या खंडीला ४० हजार रुपयांचा दर मिळत आहे, मात्र कपड्याचे दर किमी झालेले नाहीत. देशातून कापसाची निर्यात होत असून, आयातही वाढत आहे. २०१५-१६ मध्ये २२ लाख गाठी, २०१६-१७ मध्ये ३० लाख गाठी, तर २०१७-१८ मध्ये आतापर्यंत १७ लाख गाठींचे सौदे झाले आहेत. जागतिक बाजारात कापसाला प्रतिपाैंड ८२ सेंट दर मिळत आहे. सरकीच्या दरात तेजी असल्याने शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा अधिक दर मिळत असल्याने कापसाच्या आयातीवर लक्ष जात नाही.

साखरेच्या भावात मंदी येताच, आयातीवरील कर १०० टक्के करण्यात आला. तर, साखरेच्या निर्यातीला प्रतिटन ५ हजार रुपये सबसिडी देण्यात येत आहे. बफर स्टाॅक करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जात आहे. साखरेचे दर ४५ किलोपेक्षा अधिक झाले, तर साखर आयात करण्याची घोषणा सरकार करते. तर मग कापसाच्या खंडीचा दर ६० हजारांच्या वर गेल्यास कापूस आयात केला जाईल, अशी घोषणा का केली जात नाही. साखरेप्रमाणेच कापसासाठी धोरण ठरवून, आयतीवर १०० टक्के कर लावण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...