agriculture news in Marathi, vijay sugar now owned by district bank, Maharashtra | Agrowon

‘विजय शुगर'चा ताबा अखेर जिल्हा बॅंकेकडे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 मार्च 2018

सोलापूर : पंढरपूर तालुक्‍यातील करकंब येथील "विजय शुगर''ने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून घेतलेले १७६ कोटी रुपयांचे कर्ज व व्याज थकविल्याप्रकरणी विजय शुगरचा ताबा जिल्हा बॅंकेला देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी १५ जानेवारीला पंढरपूर तहसीलदारांना हा आदेश दिला होता. त्यानुसार सरफेसी (सेक्‍युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्‍शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्‌स) कायद्यानुसार हा ताबा देण्यात आला आहे. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी संबंधित हा कारखाना असल्याने या कारवाईकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले होते. 

सोलापूर : पंढरपूर तालुक्‍यातील करकंब येथील "विजय शुगर''ने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून घेतलेले १७६ कोटी रुपयांचे कर्ज व व्याज थकविल्याप्रकरणी विजय शुगरचा ताबा जिल्हा बॅंकेला देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी १५ जानेवारीला पंढरपूर तहसीलदारांना हा आदेश दिला होता. त्यानुसार सरफेसी (सेक्‍युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्‍शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्‌स) कायद्यानुसार हा ताबा देण्यात आला आहे. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी संबंधित हा कारखाना असल्याने या कारवाईकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले होते. 

विजय शुगरने गाळप केलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना अदा न केल्याने या कारखान्याच्या विरोधात एफआरपी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करून ही रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी साखर आयुक्तांच्या वतीने आरआरसी वसुलीची कारवाई सुरू होती. या कारवाईवर जिल्हा बॅंकेने आक्षेप घेत एफआरपीपेक्षा आमची रक्कम अधिक आहे. आमच्याकडे ही मालमत्ता तारण असल्याचा मुद्दा मांडत विजय शुगरचा ताबा "जिल्हा बॅंकेला''ला द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. 

जिल्हाधिकारी ताबा देत नसल्याने बॅंकेच्या वतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात १८ डिसेंबर २०१७ ला झालेल्या सुनावणीमध्ये एका महिन्यात (१७ जानेवारी २०१८च्या आत) या प्रकरणात निर्णय देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार पंढरपूरचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी ताबा देण्याची ही कार्यवाही केली. दरम्यान, खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबीयांशी संबंधित हा कारखाना असल्याने या कारवाईबाबत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण बॅंकेचा सततचा तगादा आणि उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे प्रशासनाला यामध्ये कारवाई करावीच लागली. 

अशी आहे मालमत्ता
विजय शुगरने बॅंकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेमध्ये सात गटांमधील साधारणतः ५० ते ५५ एकर जमिनीचा समावेश आहे. त्याशिवाय विजय शुगरची मशिनरी, इमारत व इतर वस्तूंचा समावेश आहे.  

बॅंक करणार मूल्यांकन 
विजय शुगरच्या मालमत्तेचे जिल्हा बॅंकेच्या वतीने मूल्यांकन करून या कारखान्याच्या विक्रीसाठी लिलाव प्रक्रिया राबविली जाईल. लिलाव प्रक्रिया करून कारखान्याला दिलेल्या कर्जाची व व्याजाची वसुली या माध्यमातून केली जाणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
द्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या...द्राक्ष विभागामध्ये ऑक्टोबर छाटणी व त्यानंतरचा...
कळमणा बाजारात सोयाबीन प्रतिक्‍विंटल...नागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढती...
जनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...
मोहरी, जवस लागवड व्यवस्थापनरब्बी हंगामात तेलबिया पिके अत्यंत महत्त्वाची असून...
मुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...
जळगाव जिल्ह्यात खरेदी केंद्रांतील...जळगाव : कडधान्य खरेदीसंबंधी शासकीय खरेदी...
टंचाईत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा ः...नांदेड ः टंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे...
वऱ्हाडात सहा तालुक्‍यांत गंभीर दुष्काळअकोला : अनियमित आणि सरासरीपेक्षा कमी झालेल्या...
अमरावती जिल्ह्यातील ‘रब्बी`...अमरावती : कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी १ लाख ६८...
संकरित कपाशीचे ‘नांदेड ४४’ वाण...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने...
सांगली जिल्ह्यातील सर्वच तलाव आटलेसांगली ः ताकारी, टेंभू, आरफळ योजनेच्या पाण्यामुळे...
पुणे विभागात अवघ्या सहा टक्के पेरण्यापुणे ः पावसाळ्यात पडलेल्या पावसाच्या खंडाचा...
राज्यात दुष्काळसदृश नाही, तर दुष्काळ...मुंबई : यंदा झालेल्या कमी पावसामुळे राज्याच्या...
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...