agriculture news in Marathi, vikhe patil says government not interested in reservation to maratha, Maharashtra | Agrowon

सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही ः विखे पाटील
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

पुणे ः मराठा आरक्षणप्रश्‍नी सरकार गेल्या तीन वर्षांपासून फसवणूक करीत असून, मराठा समाजाच्या सर्वेक्षणसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित संस्थांना कामे दिल्याने सरकारला आरक्षण द्यायचेच नाही हे स्पष्ट हाेते. पुस्तक खरेदीतही माेठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, तसेच संघ विचारसरणीची ही पुस्तके तातडीने रद्द करावीत, अशी मागणी विराेधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (ता. १३) पत्रकार परिषदेमध्ये केली. 

पुणे ः मराठा आरक्षणप्रश्‍नी सरकार गेल्या तीन वर्षांपासून फसवणूक करीत असून, मराठा समाजाच्या सर्वेक्षणसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित संस्थांना कामे दिल्याने सरकारला आरक्षण द्यायचेच नाही हे स्पष्ट हाेते. पुस्तक खरेदीतही माेठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, तसेच संघ विचारसरणीची ही पुस्तके तातडीने रद्द करावीत, अशी मागणी विराेधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (ता. १३) पत्रकार परिषदेमध्ये केली. 

विखे पाटील म्हणाले, की मराठा आरक्षणासाठी समाजाचे आर्थिक, सामाजिक सर्वेक्षणसाठी सरकारने काेकण विभागासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबाेधिनी आणि नागपूर विभागासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित संस्थेची नियुक्ती केली आहे. तर पुणे नाशिक विभागाच्या सर्वेक्षणसाठी संघाच्या संबंधित संस्थेचा शाेध सरकार घेत आहे. या संस्थाद्वारे हाेणारे सर्वेक्षण आम्हाला मान्य नसून, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ साेशल सायन्सेस, गाेखले अर्थशास्त्र संस्था, विविध विद्यापीठांद्वारे सर्वेक्षण करावी, अशी आमची मागणी आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी संघाशी निगडित भारतीय विचारधारा या संस्थेच्या पुस्तकांची बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी केली आहे. तसेच या पुस्तकांमध्ये अश्‍लील वाक्यरचना असून, विद्यार्थ्यांवर अश्‍लील संस्कार करणारी पुस्तके आहेत. यामुळे या पुस्तकाची खरेदी आणि वितरण तातडीने रद्द करावी. शिक्षक भरती ही निवडणुका डाेळ्यांसमाेर ठेऊन घेतलेला निर्णय अाहे.

या वेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी अध्यक्ष अभय छाजेड, माजी महापाैर दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, आबा बागुल आदी मान्यवर उपस्थित हाेते.

गारपीट नुकसानभरपाई विनाअट द्या
राज्यात गेल्या दाेन-तीन दिवसांत माेठ्या प्रमाणावर गारपीट झाली असून, शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. कर्जमाफीप्रमाणे काेणत्याही अटी, निकषांशिवाय सरसकट नुकसानभरपाई द्यावी.
राधाकृष्ण विखे पाटील

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...