agriculture news in Marathi, vikhepatil written later regarding quality control, Maharashtra | Agrowon

‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण विभागात हैदोस घालणाऱ्या सोनेरी टोळीची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून सखोल चौकशी करावी, असे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी सचिवांना दिले आहे.   

पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण विभागात हैदोस घालणाऱ्या सोनेरी टोळीची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून सखोल चौकशी करावी, असे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी सचिवांना दिले आहे.   

गुण नियंत्रण विभागातील गैरव्यवहारांच्या विरोधात खासदार राजू शेट्टी यांनी एक आठवड्यापूर्वीच कृषी सचिव एकनाथ डवले यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर आता विरोधी पक्षनेत्यांकडूनदेखील चौकशीची मागणी झाल्याने अधिकाऱ्यांची धावपळ अजून वाढली आहे. दुसऱ्या बाजूला कॉँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मुख्य सचिवांच्या कार्यालयात अजून एक पत्र दिले आहे. त्यांनी गुण नियंत्रणमधील टोळीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

श्री. मुंडे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी श्री. विखे यांनाही पत्र दिले आहे. विरोधी पक्षनेत्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविल्यामुळे कारवाई टाळण्यासाठी आता गुण नियंत्रण विभागाला मंत्रालयातून मिळणारे राजकीय पाठबळ अजून वाढवावे लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

श्री. विखेपाटील यांच्या कार्यालयातून कृषी सचिवांना पाठविलेल्या पत्रात “कृषी आयुक्तालयाला ‘भेट’ दिल्याशिवाय राज्यातील कृषी निविष्ठा उद्योजक व कंपन्यांना परवाने मंजूर केले जात नाहीत,” असे नमूद करण्यात आले आहे. 

“खते, बियाणे, कीटकनाशकांच्या बाजारपेठेत हजारो कोटींची उलाढाल होते. त्यासाठी शेकडो कंपन्या, डीलर्स, विक्रेत्यांना कृषी विभागाचे परवाने घ्यावे लागतात. मात्र, ‘ऑनलाइन परवाना’ असे फक्त म्हटले जाते. प्रत्यक्षात आयुक्तालयात ‘भेट’ दिल्याशिवाय परवाना मंजूर केला जात नाही. ‘ऑफलाइन’ कामकाजाला प्रोत्साहन देण्यासाठी संकेतस्थळात जाणूनबुजून घोळ केला जातो,” असे पत्रात म्हटले आहे. 

अप्रमाणित नमुन्यांचा धाक दाखवून उद्योजकांना जाळ्यात अडकवून भ्रष्टाचार केला जात असल्याचे स्पष्ट करीत या पत्रात गुण नियंत्रण विभागाचे वाभाडे काढण्यात आले आहेत. “तपासणीच्या नावाखाली निविष्ठांचे अहवाल ‘मॅनेज’ केले जातात. प्रयोगशाळांचे काम नियमाप्रमाणे होत नाही. खते, बियाणे, कीटकनाशके उत्पादक कंपन्यांना ‘प्रेझेंटेशन’च्या नावाखाली धमकावून हतबल केले जाते,’’ असेही पत्रात म्हटले आहे. 

‘‘गुण नियंत्रण विभागातील घोटाळ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आर्थिक गुन्हे विभाग किंवा विशेष दक्षता पथकामार्फत चौकशी करावी,’’ अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. “श्री. विखेपाटील यांनी या सर्व मुद्द्यांबाबत चौकशीचा तसेच कारवाईचा अहवाल कृषी सचिवांकडे मागितला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही पुढील भूमिका स्पष्ट करू,” असे विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले.  

आयुक्तांच्या हाती अधिकाऱ्यांचे भवितव्य 
 “कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडून राज्य शासनाला जाणाऱ्या अहवालावर आता गुणनियंत्रण विभागातील ‘अवगुणी’ अधिकाऱ्यांचे भवितव्य अवलंबून राहील,” असेही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गुण नियंत्रण विभागातील घोटाळ्याबाबत खासदार शेट्टी यांनी दिलेल्या पत्राला शासनाने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही, त्यामुळे मुळात या प्रकरणाची चौकशी सुरू आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही, असे आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...