विकासकामांसाठी गावकऱ्यांचा पुढाकार महत्त्वाचा

विकासकामांसाठी गावकऱ्यांचा पुढाकार महत्त्वाचा
विकासकामांसाठी गावकऱ्यांचा पुढाकार महत्त्वाचा

सोलापूर : गावातील विकासकामांसाठी सर्वांनी गटतट बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्‍यक आहे. गावच्या विकासकामांत गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग आणि पुढाकार महत्त्वाचा आहे, असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या ‘स्मार्टग्राम‘ स्पर्धेतील विजेत्या गावांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम झाला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, वसंत देशमुख, पक्षनेते आनंद तानवडे, रेखा राऊत, अरुण तोडकर, नितीन नकाते, मदन दराडे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, उद्धव माळी, बंडू ढवळे उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात स्वच्छतेचे उल्लेखनीय काम झाल्यामुळेच देशपातळीवर सोलापूरचा गौरव झाला. यात आपल्या साऱ्यांचे योगदान उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. शासन गावाच्या विकासासाठी राबवित असलेल्या योजना प्रत्येकाने आपल्या गावात राबविण्यासाठी पुढे यावे. केवळ शासनानेच गावाचा विकास करावा, यातून बाहेर पडून त्यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभाग वाढवावा.`` डॉ. भारुड म्हणाले, ‘‘सरपंच व ग्रामसेवकांनी गावाच्या शाश्‍वत विकासासाठी आराखडा तयार करणे आवश्‍यक आहे. शासकीय योजना राबविताना त्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होतील, याकडे कटाक्ष असला पाहिजे.'' ‘‘सरपंच व ग्रामसेवकाशिवाय आता गावात काहीच होऊ शकत नाही. ग्रामसेवक स्मार्ट असेल, तर सरपंच स्मार्ट होतो. सरपंच स्मार्ट असेल, तर गाव स्मार्ट व्हायला वेळ लागत नाही,'''' असे माने यांनी सांगितले. या वेळी ग्रामसेवकांसाठी कार्यशाळाही घेण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com