agriculture news in marathi, Village level committees for Khandesh | Agrowon

खानदेशात शेतरस्त्यांसाठी ग्रामस्तरीय समित्या
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

जळगाव : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत एक किलोमीटरसाठी लाखापर्यंत अनुदान दिले जाणार हे. यासंदर्भात कार्यवाहीसाठी प्रशासनाने सर्वत्र ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. काही गावांमध्ये त्या स्थापनही झाल्या असून, या समित्यांमध्ये सरपंचांनी शेतरस्त्यांसाठी पाठपुुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. 

जळगाव : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत एक किलोमीटरसाठी लाखापर्यंत अनुदान दिले जाणार हे. यासंदर्भात कार्यवाहीसाठी प्रशासनाने सर्वत्र ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. काही गावांमध्ये त्या स्थापनही झाल्या असून, या समित्यांमध्ये सरपंचांनी शेतरस्त्यांसाठी पाठपुुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. 

खानदेशात धुळे, जळगाव, नंदुरबार तापी, गोमाई, पांझरा, अनेर, गिरणा, वाघूर आदी नद्यांकाठी काळी कसदार जमीन आहे. परंतु अनेक ठिकाणी शेतरस्ते नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना दळणवळणाच्या अडचणी उद्‌भवतात. माल वाहतूकदारांनाही समस्यांना सामोरे जावे लागते. काही ठिकाणी शेतरस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. त्यातून वादाचे प्रसंग उद्‌भवतात. या स्थितीत राज्य शासनाने शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करणे, कच्चा रस्ता तयार करण्यासाठी प्रत्येक एका किलोमीटरसाठी शंभर तास जेसीबी व पाणी मारून रोड रोलरच्या सुविधेसाठी लाखाच्या खर्चापर्यंत अनुदान केले आहे.

 धुळे, जळगाव जिल्ह्यांत या कामांसाठी निधीचे वितरण झाले. प्रांत यांच्यातर्फे खर्चाचे नियोजन केले जाईल. शेतरस्ता कामांचे प्रस्ताव तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक, जिल्हा परिषदेचे बांधकाम शाखा अभियंता, उपअभियंत्यांकडे सादर करायचे आहेत. परंतु, कामांसाठी ग्रामस्तरीय समितीची मोठी जबाबदारी आहे. त्यात सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवकाचा समावेश आहे. प्रस्तावात रस्त्याची लांबी, गट क्रमांक, ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपासून रस्ता सुरू होतो व पूर्ण होतो त्यांची नावे समाविष्ट असावीत. ग्रामस्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीस प्रस्ताव सादर केल्यानंतर आराखड्यास निकषानुसार मान्यता दिली जाईल. कामाला पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागाचे उपअभियंता तांत्रिक,  प्रांताधिकारी प्रशासकीय मान्यता व कार्यादेश देतील. 

अनुदान थेट खात्यात
काम सुरू करण्यापूर्वी, प्रगतिपथावर असताना, पूर्ण झाल्यानंतर जीपीएस छायाचित्रे, यंत्रधारकाचे नाव, वाहन क्रमांक, यंत्राचे तास, रस्त्याची लांबी आदींचा स्थळ पाहणी पंचनामा तलाठी व ग्रामसेवक संबंधित खातेदार शेतकऱ्याच्या उपस्थितीत करतील. यानंतर देयक अदा करण्यासाठी ते प्रमाणपत्र देतील. याकामी मोजमाप पुस्तक वापरले जाणार नाही. यंत्रधारकास निधी मिळण्यास विलंब होणार नाही. अनुदान थेट खात्यामध्ये जमा करण्याची तरतूद योजनेत आहे. जेसीबी यंत्राद्वारे अतिक्रमण, झुडपे काढणे, खोदकामानंतर माती, मुरुम पसरविणे, तसेच लोकसहभागातून खोलीकरण, गाळ काढण्याचे काम सुरू असल्यास त्या ठिकाणची माती, मुरुम शेतरस्ते कामी वापरला जाईल, अशी माहिती मिळाली.

इतर बातम्या
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
`आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग :  कोकणातील आंबा...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...