agriculture news in marathi, Village Social Change Campaign for Sustainable Development: Dangat | Agrowon

शाश्वत विकासासाठी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान ः दांगट
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

औरंगाबाद ः ग्रामीण भागात मूलभूत सोयी सुविधांच्या उपलब्धतेसह आर्थिक, सामाजिक शाश्वत विकास साध्य करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत गावांमध्ये शासनाच्या विविधांगी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावांचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट आपल्याला साध्य करावयाचे आहे. शासकीय यंत्रणा, मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रमांतर्गत नियुक्त करण्यात आलेले ग्रामपरिवर्तक आणि ग्रामस्थ या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून कल्याणकारी योजना गावखेड्यांपर्यंत पोचवायच्या आहेत.

औरंगाबाद ः ग्रामीण भागात मूलभूत सोयी सुविधांच्या उपलब्धतेसह आर्थिक, सामाजिक शाश्वत विकास साध्य करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत गावांमध्ये शासनाच्या विविधांगी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावांचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट आपल्याला साध्य करावयाचे आहे. शासकीय यंत्रणा, मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रमांतर्गत नियुक्त करण्यात आलेले ग्रामपरिवर्तक आणि ग्रामस्थ या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून कल्याणकारी योजना गावखेड्यांपर्यंत पोचवायच्या आहेत.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत मराठवाडा विभागातील निवड झालेल्या जिल्ह्यांतील गावांमधील कामाच्या आढावा बैठक आणि एकदिवसीय कार्यशाळा शुक्रवारी (ता. २२) स्थानिक मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात पार पडली.

या कार्यशाळेला महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी संचालक डॉ. दांगट, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमन्यम, जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपायुक्त अशोक हजारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या वेळी डॉ. दांगट बोलत होते.

डॉ. दांगट पुढे म्हणाले, की गावात कृषी, पशुसंवर्धन, रेशीम लागवड, दुग्ध व्यवसाय, कौशल्य विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य विकासाच्या इतर सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावकऱ्यांचे शहराकडे होणारे स्थलांतर थांबवायचे आहे.

इतर ताज्या घडामोडी
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...
प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शोनागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ...
अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढतअमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या...
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...