पहिल्याच पावसात सिंदखेड पाणीदार

पहिल्याच पावसात सिंदखेड पाणीदार

बुलडाणा  ः ‘गाव करी ते राव न करी’ अशी एक म्हण आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण बघायचे असेल तर मोताळा तालुक्यातील सिंदखेड या गावी जावे लागेल. येथील ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्न करीत दुष्काळावर मात करण्याच्या दृष्टीने ठोस पाऊल टाकले. निर्सगानेही ग्रामस्थांना नाराज केले नाही. पहिल्याच पावसात सिंदखेडचे गावशिवार जलमय झाले आहे.

मोताळा तालुक्यातील सिंदखेड हे गाव दुष्काळाच्या छायेत असते. या गावाला कायमस्वरूपी दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी सरपंच विमलताई कदम आणि ग्रामस्थ एकत्र आले. वाॅटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या या गावातील ग्रामस्थांनी दुष्काळमुक्तीसाठी दीड महिना दिवसरात्र मेहनत घेतली. कामे करताना तज्ज्ञांचे मागर्दशन घेतले. तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या या कामामुळे सिंदखेड हे गाव तीन दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्याच पावसाने पाणीदार झाले.

सिंदखेड गावची लोकसंख्या अडीच हजार आहे. हे गाव नेहमीच पाणीटंचाईमुळे त्रस्त असते. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्न केले. या विभागाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सुरवातीपासून मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. ग्रामस्थांनी श्रमदानातून ६५ एकर परिसरात नाला खोलीकरण, शेततळे, सीसीटी, सलग समतलचर, कंपार्टमेंट बंडिग, मातीनाला बांधा, कटुंर बांध अशी जलसंधारणाची कामे केली.  कामे झाल्यानंतर ग्रामस्थांना पावसाची प्रतीक्षा होती.

मंगळवारी (ता. १९) ग्रामस्थांचे स्वप्नही साकारले. परिसरात जोरदार पाऊस झाला आणि प्रत्येक कामांमध्ये जलसाठा झाला. या गावाला स्वच्छता व इतर कामांसाठी शासनाकडून वेळोवेळी गौरविण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com