agriculture news in marathi, Villagers from Khandgedara builds Bridge through self contribution | Agrowon

लोकवर्गणीतून बांधला पूल; खांडगेदरा ग्रामस्थांची कामगिरी !
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

आश्‍वी : खांडगेदरा (ता. संगमनेर) या अवघ्या पावणेचारशे लोकसंख्येच्या गावाने सरकारी मदतीची अपेक्षा न करता, गावाच्या ओढ्यावर १०० फूट लांबीचा पूल बांधून दळणवळणाची गैरसोय दूर केली आहे.

गावाला कोठे खुर्दला जोडणाऱ्या सुमारे तीन किलोमीटरच्या रस्त्यावर ढोकरचोंड परिसरातील ओढ्याला पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्यामुळे प्रवासाची मोठी अडचण होत असे. गावातील पोलिस खात्यातील कर्मचारी रोहिदास ढोकरे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा गावाने सत्कार केला होता. त्या वेळी झालेल्या बैठकीत लोकवर्गणीतून ओढ्यावर पूल बांधण्याचा निर्णय झाला. 

आश्‍वी : खांडगेदरा (ता. संगमनेर) या अवघ्या पावणेचारशे लोकसंख्येच्या गावाने सरकारी मदतीची अपेक्षा न करता, गावाच्या ओढ्यावर १०० फूट लांबीचा पूल बांधून दळणवळणाची गैरसोय दूर केली आहे.

गावाला कोठे खुर्दला जोडणाऱ्या सुमारे तीन किलोमीटरच्या रस्त्यावर ढोकरचोंड परिसरातील ओढ्याला पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्यामुळे प्रवासाची मोठी अडचण होत असे. गावातील पोलिस खात्यातील कर्मचारी रोहिदास ढोकरे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा गावाने सत्कार केला होता. त्या वेळी झालेल्या बैठकीत लोकवर्गणीतून ओढ्यावर पूल बांधण्याचा निर्णय झाला. 

वनग्राम पुरस्काराचे एक लाख १५ हजार रुपये यासाठी वापरण्याबाबत एकमत झाले. लोकवर्गणीसाठी नोकरदारांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये, चारचाकी वाहन असलेल्याकडून एक हजार, तर उंबऱ्यामागे दोन हजार, अशी वर्गणी करून, त्यातून दोन लाख रुपये जमा झाले. जिल्हा परिषद निवडणुकीचे उमेदवार बबनराव गागरे यांनी प्रस्तावित पुलासाठी सिमेंटच्या चार नळ्या दिल्या होत्या. संगमनेर साखर कारखान्याच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब थोरात यांनी एक लाख रुपयांची मदत केली. बांधकाम साहित्याचा व मजुरीचा खर्च वगळता अन्य कामे ग्रामस्थांनी श्रमदानातून केली. त्यातून १०० फूट लांब, १६ फूट रुंद, ६० फूट उंचीच्या व सुमारे चार लाख रुपये खर्चाच्या पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. 

गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरचा हा पूल सर्वांसाठीच महत्त्वाचा होता. शासनाच्या मदतीची वाट न पाहता ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हे काम करून नवा पायंडा पाडला आहे. 
- महादू ढोकरे, 
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक 

गावात जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी कोठे खुर्द येथे जावे लागते. पावसाळ्यात ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे अनेक वेळा शाळा बुडत असे. या पुलामुळे मोठी सोय झाली आहे. 
- दर्शन ढोकरे, विद्यार्थी

 

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...