agriculture news in marathi, villages select for drip irrigation scheme, satara, maharashtra | Agrowon

शंभर टक्के सूक्ष्म सिंचनासाठी साताऱ्यातील १७३ गावांची निवड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

१०० टक्के सूक्ष्म सिंचनासाठी जिल्ह्यातील १७३ गावे प्रथम टप्प्यात निवडण्यात आली आहेत. यामध्ये या गावांमधील सर्व विहिरींवरील भीजक्षेत्र पुढील दोन वर्षांत ठिबक सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या निवडलेल्या गावांतील लोकांना पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याकरिता सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
- श्‍वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा : पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने पाणीटंचाई वाढू लागली आहे. अतिरिक्त उपशामुळे भूजल साठा वेगाने घटत आहे. यास पर्याय म्हणून जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनाला भर दिला जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी १०० टक्के सूक्ष्म सिंचनासाठी १७३ गावांची निवड केली आहे. फलोत्पादन आणि बिगर फलोत्पादन पिकाकरिता सूक्ष्म सिंचन संचासाठी अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी ५५ टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.

जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने मोसमी पावसावर अवलंबून आहे. भूजल पातळीत दिवसेंदिवस होत असलेली घट आणि पावसाचा अनियमितपणा तसेच मागील तीन वर्षांत सरासरीपेक्षा कमी पडलेला पाऊस यांमुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करणे अपरिहार्य झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानातून जल व मृदसंवर्धनाबाबत कामे हाती घेण्यात आली आहे. परंतु, उपलब्ध असलेल्या व निर्माण झालेल्या पाणीसाठ्याचा पिकांसाठी अनियंत्रित व बेसुमार वापर होत असल्याने पाणीटंचाई निर्माण होत आहे. तसेच, जलसंवर्धनाच्या कामाचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने दुष्काळजन्य स्थिती निर्माण होत आहे. दुष्काळी स्थितीमुळे पाण्याचा एकंदर असलेला साठा हा वेगाने घटत आहे.

या समस्येवर पर्याय म्हणून ठिबक सिंचन व तुषार सिंचन पद्धती वापरावर भर दिला जाणार आहे. २०१५-२०१६ ते २०१८-२०१९ अखेर जलयुक्त शिवार अभियानामध्ये निवडण्यात आलेली गावे व पाणी फाउंडेशनअंतर्गत वॉटर कॅप स्पर्धेत भाग घेतलेल्या गावांपैकी काही गावे शंभर टक्के सूक्ष्म सिचंनाखाली आणण्याचे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल कृषी दिन कार्यक्रमात घोषित केले होते. यानुसार जिल्ह्यातील १७३ गावांची निवड करण्यात आली आहे. २०१८-१९ मध्ये केंद्र शासनाने महाराष्ट्राकरिता पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना या नावाने योजनेस मान्यता दिली आहे.

यातून केंद्र व राज्याचा हिस्सा ६०:४० टक्के या प्रमाणात जिल्ह्याकरिता मोठ्या प्रमाणात निधी देणार आहे. या योजनेत फलोत्पादन आणि बिगर फलोत्पादन पिकाकरिता सूक्ष्म सिंचन संचासाठी अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी ५५ टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के दराने अनुदान दिले जाणार आहे.

तालुका निहाय निवड झालेली गावे ः सातारा १५, कोरेगाव ३०, खटाव ४०, कराड २०, पाटण ४, वाई १०, जावली ५, खंडाळा ४, फलटण २५, माण २०.
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...