हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’मध्ये निवड

हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’मध्ये निवड

हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या टप्प्यात (२०१८-१९) जिल्ह्यातील १०३ गावांची निवड करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत पूर्ण झालेल्या विविध प्रकारच्या जलसंधारणाच्या कामांमुळे जिल्ह्यतील टॅंकरची संख्या २०१६ च्या तुलनेत कमी झाली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात (२०१५-१६) जिल्ह्यातील १२४, दुसऱ्या टप्प्यात (२०१६-१७) १००, तिसऱ्या टप्प्यात (२०१७-१८) ८० गावांची निवड करण्यात आली होती. २०१८-१९ मध्ये पाच तालुक्यांतील १०३ गावांची निवड करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात १२१४ कामे पूर्ण झाली असून त्यावर ७ कोटी ३२ लाख रुपये खर्च झाला आहे.

पूर्ण झालेल्या कामांमध्ये ६१ ठिकाणी खोल सलग समतल चर घेण्यात आले. २०८ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे.४८ ठिकाणी रिचार्ज शाफ्ट घेण्यात आले आहेत. ८ सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. लोकसहभाग आणि शासकीय मिळून एकूण १३७ ठिकाणी नाला खोलीकरणाची कामे झाली आहेत. ३१ माती नालाबांध घेण्यात आले आहेत. ७३१ कामे सुरू असून ५२३ कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.

२०१६-१७ मध्ये १२,२६१ हेक्टरवर ४ हजार ८७ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ११ हजार ८८६ हेक्टरवरील ४ हजार ३७ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ५० कोटी ५७ लाख २५ हजार रुपये खर्च झाला आहे. पूर्ण झालेल्या कामांमध्ये १४७ सिमेंट बंधारे, २२ ठिकाणी ९२ हेक्टरवर सलग समतल चर, २७ ठिकाणी ६८० हेक्टरवर खोल सलग समतल चर, १५३ ठिकाणी ६ हजार ६२० हेक्टरवर ढाळीचे बांध, २०० ठिकाणी रिचार्ज शाफ्ट, ५४५ शेततळी, ७१ माती नालाबांधची कामे पूर्ण झाली आहेत. १५ ठिकाणी कामे सुरू आहेत. अद्याप ३५ कामे शिल्लक आहेत.

एप्रिल २०१६ मध्ये जिल्ह्यातील ३८ गावांमध्ये ३६ टॅंकर सुरू होते. एप्रिल २०१७ मध्ये ६ गावांत ५ टॅंकर सुरू होते. यंदाच्या एप्रिल महिन्यात १७ गावांत १६ टॅंकर सुरू होते. जलसंधारणाच्या कामामुळे भूजल पातळीमध्ये वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील टॅंकरची संख्या तुलनेने कमी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

‘जलयुक्त’मध्ये चौथ्या टप्प्यात निवड करण्यात आलेली गावे

तालुका गावांची संख्या
हिंगोली २६
कळमनुरी ११
वसमत २६
औंढा नागनाथ १९
सेनगांव २१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com