नांदेडचे देशमुख दोन लाखांच्या हिऱ्याच्या दागिन्यांचे विजेते

नांदेडचे देशमुख दोन लाखांच्या हिऱ्याच्या दागिन्यांचे विजेते
नांदेडचे देशमुख दोन लाखांच्या हिऱ्याच्या दागिन्यांचे विजेते

पुणे ः सकाळ अॅग्रोवनच्या `समृद्ध शेती बक्षीस योजना २०१८` च्या सोडतीमधील २ लाखांच्या हिऱ्याच्या दागिन्यांचे पहिले बंपर बक्षीस नांदेड येथील विनायक पंडितराव देशमुख यांना मिळाले आहे. सुमारे ३० लाखांहून अधिक रकमेच्या १ हजार ७३८ बक्षिसांची सोडत गुरुवारी (ता. १४) प्रायोजकांच्या हस्ते काढण्यात आली.  या वेळी बक्षीस योजनेचे मुख्य प्रायोजक पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक, स्मार्टकेम टेक्नॉलॉजीजचे उपसरव्यवस्थापक सतीश नरतम, व्यवस्थापक रोहन तांबे, रोहित कृषी इंडस्ट्रिजचे व्यवस्थापक अनुप मोदी, अॅग्रोस्टारचे सहयोगी व्यवस्थापक केतन माणेक, विपणन विभागाचे उपसरव्यवस्थापक राकेश थडाणी, अॅन्डस्लाईटचे महाराष्ट्राचे मुख्य वितरक प्रकाश शिंदे उपस्थित होते. सर्व प्रायोजकांचे स्वागत ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी केले.  या वेळी आदिनाथ चव्हाण म्हणाले, की दरवर्षी शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम ॲग्रोवन राबवित असतो. गेल्यावर्षी जमीन सुपीकता वर्ष म्हणून साजरे करत असताना त्यासंबधी लेख, बातम्या, कार्यशाळा राज्याच्या विविध भागांत आयोजित केल्या होत्या. यंदा जल व्यवस्थापन वर्ष साजरे करत आहोत. त्यासाठी विभागनिहाय परिषदा घेऊन शेतकऱ्यांमध्ये पाणी व्यवस्थापनाविषयी जागृती करण्याचा संकल्प सोडला आहे.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅग्रोवनचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक संभाजी घोरपडे यांनी केले. अॅग्रोवनचे मुख्य व्यवस्थापक (वितरण) चंद्रशेखर जोशी यांनी आभार मानले.  अॅग्रोवन समृद्ध शेती बक्षीस योजना २०१८ विजेते पहिले बंपर बक्षीस - २ लाख रुपये किमतीचे हिऱ्यांचे दागिने (पु. ना. गाडगीळ आणि सन्स) - विनायक पंडितराव देशमुख, जिल्हा नांदेड.   दुसरे बक्षीस - १ लाख ५० हजार किमतीचे पशुखाद्यनिर्मिती यंत्र (संजीवनी अॅग्रो मशिनरी) - प्रमोद मोहन गावडे, देवराष्ट्रे, ता. कडेगाव, जि. सांगली.  तिसरे बक्षीस - १ लाख किमतीचे हिऱ्यांचे दागिने (पु. ना. गाडगीळ आणि सन्स) - मिर्झा तौसिफ बेग फारूक बेग, जाफ्राबाद, जि. जालना. चौथे बक्षीस - पन्नास हजार किमतीचे हिऱ्यांचे दागिने (पु. ना. गाडगीळ आणि सन्स) - १) नारायण रामजी तिमेवार, खांडेगाव, ता. वसमतनगर, जि. हिंगोली २) अभय विश्वनाथ हासे, बोईसर, जि. पालघर ३) ज्ञानेश्वर नारायणराव तोटेवाड, मातुळ, ता. भोकर, जि. नांदेड ४) पुंडलिक विष्णू डकले, गेवराई गुंगी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद ५) गोविंद नारायण ससाणे, बोपेगाव, ता. वाई, जि. सातारा ६) बाबाराव रघुनाथराव अधारे, मोर्शी, जि. अमरावती ७) विनायक चंद्रभान मापारी, बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे ८) संगीता संजय दुसुंगे, कापूरवाडी, जि. नगर ९) प्रभाकर गोपाळ चव्हाण, उगाव, ता. निफाड, जि. नाशिक १०) दिनेश बी. पटेल, मिरज, जि. सांगली,  पाचवे बक्षीस (चाळीस हजार किमतीचे पेरणी यंत्र - रोहित कृषी इंडस्ट्रिज) - १) भीमाशंकर बसवणप्पा सारणे, जेवळी, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद २) अक्षय विष्णू मोगले, उजळंबा, जि. परभणी ३) आशाबाई रामदास गव्हाणे, वाठोणा, ता. भोकरदन, जि. जालना ४) सुग्रीव रामचंद्र थोरात, कालवडे, ता. कराड, जि. सातारा ५) अशोक रामभाऊ झगडे, लोणी मसदपूर, ता. कर्जत, जि. नगर.   सहावे बक्षीस (पंधरा हजार किमतीचे ठिबक सिंचन संच - सोना ड्रिप व स्प्रिंकलर) - १) नागनाथ गोवर्धन उकिरडे, आगळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर २) महावीर रामगोंडा पाटील, शिरटी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर ३) रावसाहेब शिवराम गुंजाळ, खांडगाव, ता. संगमनेर, जि. नगर ४) प्रदीप देविदास वाघ, करंमखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद ५) वाल्मिक रामभाऊ साठे, गोंडेगाव, ता. श्रीरामपूर, जि. नगर ६) श्री. मेहुल हेमलाल भाटिया, धरणगाव, जि. जळगाव ७) सुभाष नामदेव पाटील, इटकरे, ता. वाळवा, जि. सांगली ८) नानासाहेब भीमराव काकडे, नालेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद ९) भाऊसाहेब त्र्यंबक रंधे, एरंडगाव बु. ता. येवला, जि. नाशिक १०) गणेश दगडू बनकर, वीर, जि. पुरंदर, जि. पुणे ११) सविंद्र पांडुरंग कुलकर्णी, गिरवी, ता. माळशिरस, जि. सोलापूर १२) तुषार रामचंद्र माने, काशिळ, जि. सातारा १३) भिकोबा सोपान दरेकर, खामगाव, ता. दौंड, जि. पुणे १४) निर्मला श्रीरंग पऊळ, आडगाव, जि. बीड १५) शाम जनार्दनराव आंबोरे, ताडकळस, ता. पूर्णा, जि. परभणी १६) विनोदकुमार अमोलकचंद गुंदेचा, चांदा, ता. नेवासा, जि. नगर १७) सागर अरुण पवार, राहुरी, जि. नगर, १८) गणेश दामू निसाळ, भगूर, जि. नाशिक १९) पंडित दामू आहिरे, साक्री, जि. धुळे २०) रामा गोपाळा दराडे, सत्यगाव, ता. येवला, जि. नाशिक उर्वरित विजेत्यांची यादी एप्रिलमध्ये अॅग्रोवन समृद्ध शेती बक्षीस योजना सोडतीमधील प्रमुख बक्षिसांच्या विजेत्यांशी संपर्क साधला जाईल. सरकारी नियमानुसार विजेत्यांना गिफ्ट टॅक्स जमा करावा लागेल. योजनेतील उर्वरित क्रमांक सात ते नऊ तसेच उत्तेजनार्थ बक्षिसांच्या विजेत्यांची यादी एप्रिलमध्ये ॲग्रोवनमधून आवृत्तीनिहाय प्रसिद्ध केली जाईल.  ही बक्षिसे अशी (कंसात बक्षिसांची संख्या) ः सातवे बक्षीस - स्मार्टकेम टेक्नॉलॉजिजकडून ५००० रुपयांची खते (१००), आठवे बक्षीस - ॲग्रोस्टारकडून १००० रुपयांची गिफ्ट कूपन्स (५००), नववे बक्षीस - ॲन्डस्लाईटकडून नॅनो रिचार्जेबल बॅटरी (६००), उत्तेजनार्थ - आकर्षक भेटवस्तू (५००).    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com