agriculture news in marathi, Virtual education, Prataprao Pawar | Agrowon

शेतीला ज्ञानाचे व्यावसायिक अधिष्ठान द्यावे लागेल : प्रतापराव पवार
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

पुणे : शेतीमधून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी पारंपरिक दृष्टिकोनाला आता आधुनिक ज्ञानाचे व्यावसायिक अधिष्ठान द्यावे लागणार आहे. गावपातळीवर विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची ही जाणीव निर्माण होण्यासाठी शाळेत दिलेले कृषी शिक्षण उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले. 

पुणे : शेतीमधून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी पारंपरिक दृष्टिकोनाला आता आधुनिक ज्ञानाचे व्यावसायिक अधिष्ठान द्यावे लागणार आहे. गावपातळीवर विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची ही जाणीव निर्माण होण्यासाठी शाळेत दिलेले कृषी शिक्षण उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले. 

 पुणे येथील रावबहादूर नारायणराव बोरावके सेंटर फॉर अॅग्रीप्रेन्युअरशिपच्यावतीने उभारलेल्या राज्यातील पहिल्या कृषिकेंद्रित अभ्यासक्रमावर आधारित ''व्हर्च्युअल क्लासरूम'' व ''सायब्ररी''चे उद्घाटन करताना ते बोलत होते. कृषितज्ज्ञ उदय बोरावके यांच्या संकल्पनेतून चांबळी (ता. पुरंदर) येथील कृषी औद्योगिक विद्यालयात सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

शाळेच्या प्रांगणात झालेल्या या उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर ‘बायफ’चे विश्वस्थ व टाटा सन्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक किशोर चौकर, उदय बोरावके, नीलिमाताई बोरावके, महाएफपीसीचे अध्यक्ष योगेश थोरात, श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष भय्यासाहेब खैरे, सचिव संतोष जगताप, सरपंच हेमलता खटके होते. रावबहादूर बोरावके यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात आला. 

श्री. पवार म्हणाले, ''आम्ही शेतकरी कुटुंबातून पुढे आलो आणि गावातील मारुती मंदिरात भरणाऱ्या शाळेत शिकत मेंढरं राखत वाढलो. शेतकऱ्यांना आता व्यावसायिक अंगानेच शेतीकडे पाहावे लागेल. त्यासाठी ज्ञान, माहितीच्या वाटेने जावे लागेल. अॅग्रोवन आम्ही त्या हेतूनेच सुरू केला आहे. उदय बोरावके यांनी कृषिज्ञानाचा हाच दृष्टिकोन ठेवत विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. माझ्या मते राज्यासाठी हा उपक्रम अनुकरणीय आहे.'' 

संपर्क : rbcap125@gmail.com (०२०-२६८१६६३०) येथे करता येईल. 

इतर ताज्या घडामोडी
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...
उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये...सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत...
गिरणा धरणातून पहिले आवर्तन सोडलेचाळीसगाव :  गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले...
पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे...औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत...अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या...
रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई...अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न...
व्यावसायिक कल्चरमुळे वाढते...खाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास...
बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून...बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
मध्यम आकाराचे मांसभक्षक येतील पर्यावरण...मध्यम आकाराच्या मांसभक्षक प्राण्यांवर...