agriculture news in marathi, Vishwajeet kadam elected for Sangli byelection | Agrowon

कडेगावमधून विश्वजित कदम बिनविरोध; भाजपची माघार
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सोमवारी (ता. १४) माघार घेतली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अटी-शर्थीशिवाय माघार घेतल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सोमवारी (ता. १४) माघार घेतली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अटी-शर्थीशिवाय माघार घेतल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीतील चुरस संपुष्ठात आली आहे. माजी मंत्री व कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होत आहे. कै. कदम यांचे चिरंजीव विश्‍वजित यांना कॉँग्रेसने उमेदवारी दिलीे. २८ मे रोजी मतदान होणार होते, मात्र आता अन्य चार जणांचे अर्जही मागे घेण्यात आले आहे.

प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या विश्‍वजित यांच्यासाठी ही निवडणूक पुढील राजकीय वाटचालीचा महत्त्वाचा टप्पा असेल. प्रारंभी ही निवडणूक बिनविरोध होईल असेच वातारवण होते; मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनपेक्षितपणे संग्रामसिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणूक चुरशीचे होईल असे संकेत दिले. अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले होते. 

भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे आणि विलासराव जगताप, देशमुख यांचे पक्षांतर्गत विरोधक अशी प्रतिमा निर्माण झालेले खासदार संजय पाटील अशी मात्तबर मंडळी संग्रामसिंह यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. संग्रामसिंह यांचे चुलत भाऊ व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचाही डमी अर्ज दाखल करण्यात आला होता. हा अर्ज छाननीत अवैध ठरला. कारण देशमुख यांनी उमेदवारी भाजपची असे अर्जात नमूद केले असले, तरी त्याला एबी फॉर्म मात्र जोडलेला नव्हता. त्यामुळे विश्‍वजित विरुद्ध संग्रामसिंह असा सामना निश्‍चित झाला होता. मात्र अचानकपणे संग्रामसिंह यांनी माघार घेत विश्‍वजित यांचा मार्ग सुकर केला आहे. 

भाजपने उमेदवार उभा केल्यानंतरही या निवडणुकीत शिवसेनेने माघार घेत विश्‍वजित यांना पाठिंबा दिला होता. खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचा पाठिंबा देणारे पत्र प्रसिद्धीस दिले होते.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
नाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...