ज्वार संशोधन केंद्रास आयसीएआर पुनरावलोकन समितीची भेट

ज्वार संशोधन केंद्रास आयसीएआर पुनरावलोकन समितीची भेट
ज्वार संशोधन केंद्रास आयसीएआर पुनरावलोकन समितीची भेट

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्रास नुकतीच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पंचवार्षिक पुनरावलोकन समितीने (कुआरटी) भेट दिली. नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे या समितीच्‍या माध्‍यमातून दर पाच वर्षांनी कृषी संशोधन केंद्रांचा आढावा घेतला जातो. या समितीचे अध्यक्ष हिसार येथील चौधरी चरण सिंह कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. एस. खोकर होते.

सदस्यामध्ये हैद्राबाद येथील आयआयएमआरचे माजी संचालक डॉ. जे. व्ही. पाटील, माजी प्रकल्प समन्वयक (बाजरा) डॉ. ओ. व्ही. गोविला, बेंगलोर येथील माजी प्रकल्प समन्वयक डॉ. चन्नाबायरे गोवडा, आयआयएमआर, हैद्राबाद येथील मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. एच. एस. तलवार आदींचा समावेश होता.या समितीने ज्वार संशोधन केंद्रावरील प्रक्षेत्र आणि प्रदर्शनास भेट दिली.रब्बी ज्वारीच्या विविध संशोधनात्‍मक प्रयोग तसेच नवीन संशोधित वाणांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्‍या अध्यक्षतेखाली या समितींच्या सदस्‍यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. पी. म्हेत्रे, ज्वार पैदासकार डॉ. एल. एन. जावळे आदीसह विविध विभागांचे शास्त्रज्ञ, मानोली (ता. मानवत जि. परभणी), वाई (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील ज्‍वार उत्‍पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी डाॅ. ढवण म्‍हणाले की, खरीप आणि रब्बी ज्वारी हे बदलत्या वातावरणामध्येही तग धरणारे पिके आहेत. या पासून मनुष्‍यासाठी पोषक अन्न तसेच जनावरासाठी चांगल्या प्रतीचा कडबा मिळतो. सध्या ज्वारीपासून तयार केल्या जाणाऱ्या रवा, शेवया, पोहे, बिस्कीट, लाह्या मूल्यवर्धीत आदी पदार्थांची मागणी वाढत आहे. त्यामुळे ज्‍वारीला पुन्हा आर्थिक महत्त्व प्राप्‍त होईल. 

यावेळी डॉ. खोकर यांनी उपस्थित ज्‍वार उत्‍पादकांना नवीन ज्वारीचे वाण व संशोधान अपेक्षाबाबत विचारणा केली. मानोली येथील प्रगतशील शेतकरी मदन महाराज शिंदे यांनी कमी पाण्‍यात लवकर येणारा व प्रथिनांचे प्रमाण जास्त असणारा वाण विकसीत करण्‍याची गरज असल्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली. वाई येथील शेतकरी नामदेव संभाजी लाखाडे यांनी ज्वार संशोधन केंद्राकडून आदिवासी उपयोजनेअंतर्गत वाई येथे राबविण्‍यात आलेल्‍या वाणांच्या प्रात्यक्षिकांना आदिवासी शेतकऱ्यांना लाभ झाल्‍याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com