agriculture news in marathi, votting machine to be changed in seven district | Agrowon

सहा जिल्ह्यांमधील मतदान यंत्रे बदलणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

नगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यासाठी नव्याने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे येणार आहेत. शुक्रवारी (ता. १५) जिल्हा निवडणूक शाखेने हैदराबाद येथून ही यंत्रे आणून दहा दिवसांत त्यांची प्राथमिक तपासणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे अादेश केंद्रीय निवडणूक आयोगाने काढला आहे. त्यामुळे यापूर्वी बंगळूर येथून अाणलेली आणि तपासणी प्रक्रिया पूर्ण झालेली यंत्रे दुसऱ्या जिल्ह्यांना देण्यात येणार आहेत. 

नगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यासाठी नव्याने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे येणार आहेत. शुक्रवारी (ता. १५) जिल्हा निवडणूक शाखेने हैदराबाद येथून ही यंत्रे आणून दहा दिवसांत त्यांची प्राथमिक तपासणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे अादेश केंद्रीय निवडणूक आयोगाने काढला आहे. त्यामुळे यापूर्वी बंगळूर येथून अाणलेली आणि तपासणी प्रक्रिया पूर्ण झालेली यंत्रे दुसऱ्या जिल्ह्यांना देण्यात येणार आहेत. 

या प्रकारामुळे मात्र जिल्हा निवडणूक शाखेचा मनस्ताप वाढणार आहे. नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना नवीन यंत्रे येणार आहेत. पूर्वीची यंत्रे शेजारच्या जिल्ह्यांना दिला जाणार आहेत. मतदान यंत्रे का बदलली जात आहेत, याची कारणे मात्र सांगितली जात नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुरुवारी (ता.७) जिल्हा निवडणूक शाखेला मतदान यंत्रे बदलण्याबाबतचा आदेश प्राप्त झाला. मतदान यंत्रे आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेचे पाच अधिकारी, कर्मचारी व १५ पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक लवकरच हैदराबादला जाणार आहे. पंधरा गाड्यांमधून ही यंत्रे जिल्ह्यात येतील. दहा दिवसांत त्यांची प्राथमिक तपासणी करायची आहे. 

ऑगस्ट २०१८ च्या अखेरीस बंगळूर येथून आठ हजार २० बॅलेट युनिट (बीयू), चार हजार ६६३ कंट्रोल युनिट (सीयू), चार हजार ६६३ यंत्रे येथील निवडणूक शाखेकडे आली. त्या यंत्रांची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५० लाखांचा खर्च त्यावर झाला. बेल (भारत इलेक्‍ट्रॉनिक लिमिटेड) कंपनीचे तंत्रज्ञ व निवडणूक शाखेचे कर्मचारी अडीच महिन्यांपासून या प्रक्रियेसाठी तैनात होते.

विधानसभा मतदारसंघनिहाय प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी दोन यंत्रे देण्यात आली. नव्याने येणाऱ्या मशिन इलेक्‍ट्रॉनिक कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड कंपनीच्या आहेत. 

प्रशासनाचा ताण वाढणार
मतदान यंत्रबाबतच्या शंकाचे निरसण करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून गावागावांत जाऊन लोकांना त्याच प्रात्यक्षिके दाखवली गेली. मात्र आता प्रात्यक्षिके दाखवलेली मतदान यंत्रे बदलणार असून नव्याने आलेल्या मतदान यंत्राचेही प्रात्यक्षिके करावी लागणार आहेत. त्यामुळे प्रशासनाचा ताण पुन्हा वाढणार आहे. 

इतर बातम्या
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरमध्ये आज...नांदेड : लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
‘महाबीज’तर्फे बीजोत्पादनासाठी आगाऊ...जळगाव : आगामी खरिपासाठी सोयाबीन, उडीद, मूग, ताग,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यावर संकटनाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
पेमेंट न मिळाल्याने वसाकाच्या ऊस...नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...