उसाची ‘व्हीएसआय १२१२१’ जात प्रसारित करण्यास मान्यता

उसाची ‘व्हीएसआय १२१२१’ जात प्रसारित करण्यास मान्यता
उसाची ‘व्हीएसआय १२१२१’ जात प्रसारित करण्यास मान्यता

पुणे : अखिल भारतीय ऊस संशोधन समन्वयीत प्रकल्पांतर्गत नुकतीच दक्षिण भारतात पहिली आलेली आणि शेतकऱ्यांमध्ये ‘व्हीएसआय १२१२१’ (व्हीएसआय ०८००५) ही जात अधिक पसंतीस उतरलेली आहे. या जातीस दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये झालेल्या ४६ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीमध्येही जात प्रसारित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे, असे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊस प्रजनन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे यांनी सांगितले.  शेतकरी व साखर कारखाना स्तरावर या जातीचा अधिक ऊस व साखर उत्पादनवाढीसाठी मदत होणार आहे. ही जात लवकर वाढणारी, तसेच को-८६०३२ पेक्षा जास्त ऊस व साखर उत्पादन देणारी, खोडवा पिकाचे चांगले उत्पादन देणारी, उसाला तुरा न येणारी, फुटवे व पक्व उसाची संख्या जास्त असणारी, पानांवर कूस नसलेली, तसेच धाग्याचे प्रमाण अधिक असल्याने जातीमध्ये कडकपणा दिसून येणारे गुण यामध्ये आहेत. ही जात काणी, तांबेरा, लाल रंगाचा होणाऱ्या रोगास मध्यम प्रतिकारक्षम आहे. आडसाली, पूर्वहंगामी व सुरू या तिन्ही हंगामांत या जातीची लागवड करता येते. कांडीमध्ये दशीचे प्रमाण अजिबात राहत नाही. ही जात सर्वसाधारणपणे १३ ते १४ महिन्यांत पक्व होते.   एकूण ७३ चाचणी प्रयोगांच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे, की या  जातीचे सरासरी ऊस उत्पादन प्रतिहेक्टरी १४१.२४ टन एवढे आहे. जास्तीचे सरासरी साखर उत्पादन २०.३१ मे.िट्रक टन प्रतिहेक्टरी इतके मिळते. या जातीमध्ये रसातील साखरेचे प्रमाण को-८६०३२ पेक्षा ४.२४ टक्के इतके जास्त आहे. या जातीचा  खोडवा चांगला येत असून, त्यांची उत्पादकता १२१.१२ मे.िट्रक टन इतकी आहे. को-८६०३२ या तुल्य जातीपेक्षा ऊस उत्पादन १८.८५ टक्के व साखर उत्पादन २१.१५ टक्के व खोडवा उत्पादन १५.४२ टक्के जादा मिळते. या जातीमध्ये अधिक साखर असल्याने गुळासाठीसुद्धा ही जात अधिक फायदेशीर राहणार आहे. याबरोबरच या जातीचे शुद्ध बेणे संस्थेमार्फत कारखाना व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. इतर कोठूनही परस्पर बेणे आणू नये, असे आवाहन संस्थेने केले आहे.   लागवड, व्यवस्थापन करताना घ्यावयाची काळजी 

  • वय १३-१४ महिने किंवा जास्त राहण्यासाठी आडसाली, पूर्वहंगामी व सुरू या हंगामात लागवड करावी.
  • बेणे प्रक्रिया (.िजवाणू संवर्धकासहित) आवश्यक.
  • जमिनीत सें.िद्रय कर्ब जास्तीत जास्त असावे 
  • रासायनिक खत मात्रा नेहमीपेक्षा पंचवीस टक्के अधिक द्यावी.
  • सरीतील अंतर चार ते पाच फूट व दोन रोपांतील अंतर दोन फूट ठेवावे.
  • खोडवा व्यवस्थापनाचे सुधारित तंत्र वापरावे.
  • ठिबक सिंचन व्यवस्थापन आवश्यक.
  • ‘व्हीएसआय १२१२१’ या जातीची वैशिष्ट्ये

  • पाने लांब, मध्यम रुंद व गर्द हिरवी असून, मध्य भागास झुकलेली असतात.
  • पानाच्या देठावर कुस नसल्याने याचा वापर जनावरांना चाऱ्यासाठी चांगला होतो. 
  • देठाचा पृष्ठभाग हिरवा असून, त्यावर मेणाचे प्रमाण कमी असते. 
  • पानाच्या जोडावर एका बाजूने लांब कान (कर्णिका) असतात.
  • कांड्याचा रंग हिरवट पारवा असून, त्यावर मेणांचे मध्यम प्रमाण असते. 
  • कांड्या मध्यम जाड असून, लांब व एकसारख्या असतात. 
  • कांडीवर डोळ्यांच्या उभ्या रेषेत खाच असते. डोळा गोल व मध्यम आकारमानाचा असतो. 
  • कांड्यामध्ये दशीचे प्रमाण अजिबात नसते. 
  • इतर जातीपेक्षा जलद वाढत असल्याने थोडेसे लोळ्याचे व पांक्षा फुटव्याचे प्रमाण दिसून येते.   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com