कर्जमाफीच्या पिवळ्या यादीची प्रतीक्षा

कर्जमाफीच्या पिवळ्या यादीची प्रतीक्षा
कर्जमाफीच्या पिवळ्या यादीची प्रतीक्षा

सांगली ः दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील २६ शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपात कर्जमाफीच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानास शंभर टक्के पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आपले सरकार या संकेतस्थळावर टाकली आहे. त्यामध्ये त्रुटी असल्यास त्याची पूर्तता केल्यानंतर कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मात्र जोपर्यंत त्रुटीची ‘पिवळी यादी’ प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत या त्रुटी पूर्ण करता येणार नाहीत.   जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. हे शेतकरी १ लाख ८६ हजार कुटुंबातील आहेत. अर्जदार पती, पत्नी व अठरा वर्षाखालील अपत्ये यांचे एक कुटुंब गृहीत धरले आहे. त्यानुसार जिल्ह्यातून कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी १ लाख ८६ हजार अर्ज आहेत. मात्र, आपले सरकार या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या हिरव्या यादीतील शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. त्यांची कर्जाची रक्कम नोंद नाही. कर्जमाफीची हिरवी यादी म्हणजे निकषांनुसार शंभर टक्के पात्र व सर्व कागदपत्रे असलेली यादी आहे. कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाची पिवळी यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. यामध्ये त्रुटींची पूर्तता केल्यास यादीतील शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना अंतर्गत दीड लाख रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. मात्र, त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्‍श्‍याची संपूर्ण परतभेड बॅंकेत जमा केल्यानंतर दीड लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. दीड लाखावरील थकीत रक्कम न भरलेले, अन्य त्रुटी असलेले शेतकरी पिवळ्या यादीमध्ये असणार आहेत. जिल्ह्यातील दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी नव्वद हजारांवर आहे. दरम्यान, अपात्र व्यक्तींची संख्या अद्याप निश्‍चित झालेली नाही. मात्र, पहिल्या टप्प्यातील ग्रीन यादी पाहता तुलनेने कमी शेतकऱ्यांचा समावेश हिरव्या यादीत झाला आहे. आता पिवळी यादी कधी प्रसिद्ध होणार आहे, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दीड लाखापर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या खातेदारांची संख्या (कर्ज कोटीमध्ये)

तालुका     खाती     थकित कर्ज
शिराळा     १८३५     ७.९४ 
वाळवा     ५०४६     १५.६८
मिरज     ६६०६     २८.९०
कवठेमहांकाळ     ५०१०     १४.७३
जत     १३०२१     ७४.१४
तासगाव     ८८४४     ५१.९७
खानापूर     २५७४     ८.५०
आटपाडी     २०९५     ८.२
पलूस     २७९६     ११.१६
कडेगाव     २३४१     १०.८९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com