agriculture news in marathi, Waiting for 60 thousand farmers of Bhavantar grants | Agrowon

भावांतर अनुदानाची ६० हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत तूर आणि हरभऱ्यासाठी आॅनलाइन नोंदणी केलेल्या परंतु वजनमाप राहिलेल्या ६० हजार ७२८ शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदानाची प्रतीक्षा आहे. जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाकडून पडताळणी केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या याद्या मुंबई येथे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत तूर आणि हरभऱ्यासाठी आॅनलाइन नोंदणी केलेल्या परंतु वजनमाप राहिलेल्या ६० हजार ७२८ शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदानाची प्रतीक्षा आहे. जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाकडून पडताळणी केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या याद्या मुंबई येथे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

या तीन जिल्ह्यांतील नाफेड आणि विदर्भ को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी मंगळवार (ता. १५ मे) पर्यंत २९ हजार ७२ शेतकऱ्यांची ३ लाख ४५ हजार १५२ क्विंटल तूर खरेदी झाली. परंतु, त्यानंतर खरेदी बंद केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील १० हजार ८८८ शेतकरी,

परभणी जिल्ह्यातील १४ हजार ७८८, हिंगोली जिल्ह्यातील ७ हजार ४२० अशी एकूण ३३ हजार ९६ शेतकऱ्यांच्या तुरीचे वजनमाप करायचे राहिले. त्याचप्रमाणे या तीन जिल्ह्यांमध्ये बुधवार (ता. १३ जून) पर्यंत १० हजार ४४६ शेतकऱ्यांचा १ लाख ५५ हजार ६७३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

खरेदी बंद झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील १५ हजार ५८६ शेतकरी, परभणी जिल्ह्यातील ५ हजार ४९० शेतकरी, हिंगोली जिल्ह्यातील ६ हजार ५५६ शेतकरी असे एकूण २७ हजार ६३३ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे वजनमाप राहिले. त्यामुळे तीन जिल्ह्यांतील तूर आणि हरभरा मिळून एकूण ६० हजार ७२८ शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदान द्यावे लागणार आहे. दरम्यान, तूर खरेदीचे ९५ टक्के तर हरभऱ्याचे ९० टक्के चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदान
नोंदणी करून वजनमाप न झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्यांची पडताळणी जिल्हास्तरावर केल्यानंतर या याद्या मंजुरीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आल्या आहेत. भावांतर योजनेअंतर्गत तूर, हरभऱ्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १० क्विंटल दोन हेक्टरच्या मर्यादेत कमाल २० क्विंटलच्या मर्यादेत प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...