अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार समित्यांची प्रतीक्षा
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार समित्यांची प्रतीक्षा

अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार समित्यांची प्रतीक्षा

अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍याबरोबरच त्यांची नेमकी गरज ओळखून मार्गदर्शन करण्याचे काम कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (अात्मा) काम करते. या यंत्रणेचा अाराखडा बनविणे, मंजुरी देणे अादी दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या तालुका व जिल्हास्तरीय समित्यांचे गठन गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून झालेले नसल्याची बाब समोर अाली अाहे.

गेल्या काही दिवसांपासून अात्मा यंत्रणेच्या कामकाजात सातत्याने शिथिलता येत अाहे. शेती विस्तार कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका असलेला हा विभाग शासनाकडून दुर्लक्षित ठेवला जात अाहे. काही महिन्यांपूर्वी येथील अात्मा प्रकल्प संचालक सेवानिवृत्त झाल्यानंतर पदभार जिल्हा अधीक्षकांकडे सोपविण्यात अाला. पूर्णवेळ असलेल्या प्रकल्प उपसंचालकांचीही बदली करण्यात अाली. यामुळे अाता पूर्णवेळ अधिकारी अात्मासाठी राहलेले नाहीत. 

कृती अाराखडा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अात्माच्या समित्यांचेही गठन रखडलेले अाहे. अाधी तालुक्यांच्या समित्यांचे गठन केले जाते. त्यानंतर या समित्यांमधून जिल्ह्याला प्रतिनिधी जातात. अद्याप अकोला जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांच्या समित्या निश्चित झालेल्या नाहीत. तालुका समितीवर त्या-त्या तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी नियुक्त केले जातात. तर जिल्हा समितीत जिल्ह्यातील जाणकार शेतकऱ्यांचा समावेश होणे अपेक्षित असते. मात्र, या दोन्ही समित्यांवर मागील काही वर्षांत राजकीय नेत्यांना संधी हवी असते. त्यामुळे विविध राजकीय पदाधिकारी अशा समित्यांवर वर्णी लागावी यासाठी प्रयत्नरत असतात. 

समितीतील सदस्यांचे जिल्हा, अातंरराज्य, तसेच इतर राज्यांत दौरे होत असतात. त्यामुळे अनेकांना समितीवर जाण्याची लगबग दिसून येते. सध्या या समित्यांचे गठनच झालेले नाही. यंत्रणांकडून समिती गठनाची प्रतीक्षा केली जात अाहे.

तालुकास्तरीय समित्या गठित झाल्यानंतर जिल्हा समितीचे गठन केल्या जाईल. तालुक्यांना ही प्रक्रिया करण्याबाबत सूचना देण्यात अालेल्या अाहेत. - राजेंद्र निकम, प्रकल्प संचालक अात्मा, तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com