agriculture news in marathi, Waiting for farmers to milk subsidy in Solapur | Agrowon

सोलापुरात दूधदराच्या अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना जिल्हा दूध संघाकडून दूध दराच्या अनुदानापोटी द्यावयाचे अनुदान वाटप अद्यापही रखडतच सुरू असल्याचे दिसून येते. सरकारकडे या अनुदानाचे सुमारे तीन कोटी रुपये येणेबाकी असल्याचे संघाकडून सांगण्यात येते. प्रत्यक्षात अनुदान वाटपाच्या कामात अद्यापही सुसूत्रता आलेली नाही. या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला मात्र प्रतीक्षाच आली आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना जिल्हा दूध संघाकडून दूध दराच्या अनुदानापोटी द्यावयाचे अनुदान वाटप अद्यापही रखडतच सुरू असल्याचे दिसून येते. सरकारकडे या अनुदानाचे सुमारे तीन कोटी रुपये येणेबाकी असल्याचे संघाकडून सांगण्यात येते. प्रत्यक्षात अनुदान वाटपाच्या कामात अद्यापही सुसूत्रता आलेली नाही. या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला मात्र प्रतीक्षाच आली आहे.

सोलापूर जिल्हा दूध संघाला दूध घालणाऱ्या ५७२ दूध संस्था आहेत. या संस्थांचे व्यवहार असणाऱ्या २७५ बॅंका आहेत. त्यानुसार त्याचे नियोजन व्हायला हवे. सरकारने गाईच्या दूध खरेदीसाठी शेतकऱ्यांना पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. ही रक्कम मिळवण्यासाठी दूध उत्पादक संस्थांना अडचणी येत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पण अद्यापही त्यात फारशी प्रगती झालेली नाही. दूध संस्थांचे पदाधिकारी बॅंका आणि संघाकडे हेलपाटे मारत आहेत.

या अनुदानासाठी संस्थांना संबंधित शेतकऱ्यांचे खातेनंबर, दूध संकलन याची माहिती संबंधित अनुदानासाठी द्यावयाची आहे. त्यानंतर संघाकडून त्याची खातरजमा करून ते बॅंकेत जाणार आहे. या सगळ्यामध्ये वेळतर चालला आहेच. पण प्रत्यक्षात हाती मात्र काहीच लागत नाही. काही मोजक्‍या दूध संस्था सोडल्या, तर अद्यापही अनेक दूध संस्था या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

शेतकरी थेट दूध संस्था चालकांना जबाबदार धरत असल्याने त्यांचीही अडचण होऊन बसली आहे. सर्व नोंदी, खातेनंबर व्यवस्थित असल्याशिवाय अनुदानही जमा होत नसल्याने त्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

संघाकडून बॅंकनिहाय कर्मचारी
जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी या कामासाठी पुढाकार घेऊन संचालक मंडळाची नुकतीच बैठक घेतली. त्यात अडचणी सोडविण्यासाठी दूध संघाचे कर्मचारी बॅंक शाखानिहाय नियुक्त करण्याची सूचना त्यांनी केली. यात परिचारक यांनी योजनेचा आढावा घेतला. सरकारने दिलेले अनुदान दूध उत्पादकांना मिळवून देण्यासाठी संस्थांत जागृती करा, अनुदानासाठी आवश्‍यक असलेली माहिती वेळेत पुरविण्यासाठी संघाची यंत्रणा तत्पर करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांनीही काही सूचना या वेळी मांडल्या.

इतर बातम्या
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष...वाळवा, जि. सांगली : ‘‘स्वबळावर उत्पादन क्षमता...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची...वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या...
अंकलगी तलाव आटू लागलासांगली : जत पूर्व भागातील ४१ गावांना पाणीपुरवठा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त...औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'नाशिक : नाशिक शहरातील हिरकणी अटल अभिनव सहकारी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
नगर : चार छावण्यांची परवानगी रद्दनगर : पशुधन वाचविण्यासाठी छावणीला मंजुरी...
औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...