agriculture news in marathi, Waiting to fill up the project in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्याला प्रकल्प भरण्याची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमधील वाघूर व गिरणा धरण अजूनही ५० टक्के देखील भरलेले नाही. पावसाळा महिनाभर राहिलेला आहे. फारसे दिवस पावसाळ्याचे नसल्याने प्रकल्प भरतील की नाही, हा मुद्दाही उपस्थित झाला आहे.

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमधील वाघूर व गिरणा धरण अजूनही ५० टक्के देखील भरलेले नाही. पावसाळा महिनाभर राहिलेला आहे. फारसे दिवस पावसाळ्याचे नसल्याने प्रकल्प भरतील की नाही, हा मुद्दाही उपस्थित झाला आहे.

जिल्ह्यात सरासरीच्या ६१ टक्केच पाऊस झाला आहे. सोयाबीन, कोरडवाहू कापसाच्या पिकाला पावसाची नितांत गरज आहे. वाघूरमध्ये ४६.७३, गिरणामध्ये ४८.२८ व हतनूरमध्ये ७१.७६ टक्के जलसाठा आहे. हतनूरचे दोन दरवाजे मागील आठवड्यात अर्ध्या मीटरने उघडे होते. पण पाण्याचा प्रवाह बंद असल्याने या धरणाचे दोन्ही दरवाजे बंद केले आहेत. इतर प्रकल्पांमधील पाण्याचा प्रवाहदेखील बंद झाला आहे. मागील दोन दिवसात कुठल्याही धरणाची पाणी पातळी फारशी वाढलेली नाही. पाणी पातळी वाढलेली नसल्याने टक्केवारी स्थिर दिसत आहे.

पश्‍चिम भागातील मन्याड, बहुळा, भोकरबारी, बोरी, अंजनी हे प्रकल्प कोरडेच आहेत. पाचोरा तालुक्‍यातील हिवरा प्रकल्पात ३० टक्केही साठा झालेला नाही. जामनेर तालुक्‍यातील तोंडापूर प्रकल्पात ३.७३ टक्के जलसाठा झाला आहे.

चोपडा व शिरपूर (जि. धुळे) तालुक्‍यासाठी उपयुक्त असलेल्या अनेर धरणातील साठा वाढला असून, तो ७०.९४ टक्के एवढा झाला आहे. तर यावल तालुक्‍यातील सातपुडा पर्वताजवळील मोर धरणातील साठा ५२ टक्के झाला आहे.

धुळ्यात पांझरा भरले

धुळे जिल्ह्यातील मालनगाव, अमरावती हे प्रकल्पही कोरडेच आहेत. फक्त पांझरा प्रकल्प भरला आहे. तापी नदीला चांगले प्रवाही पाणी आहे. सुलवाडे बॅरेजचे दरवाजेही बंद केल्याची माहिती मिळाली. शिंदखेडा, साक्री, धुळे भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...