agriculture news in marathi, Waiting for more ten days for extra milk rate | Agrowon

वाढीव दूधदरासाठी दहा दिवसांनंतरही प्रतीक्षाच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

आता एक ऑगस्टापासून वाढीव दर देणार आहोत, असे सांगितले आहे. वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही?
- महेंद्रकुमार बाजारे, दूध उत्पादक, महूद, ता. सांगोला.

माझी स्वतःची खासगी छोटी डेअरी आहे. शेतकरी मला सातत्याने दराबाबत विचारणार करतात, पण शासन निर्णयानुसार आम्हाला दर मिळाला, तर पुढे आम्ही तो शेतकऱ्यांपर्यंत पोचवू शकतो. काहीतरी मार्ग काढून दर दिला पाहिजे.
- पदमाकर भोसले, अध्यक्ष, मथुरा दूध डेअरी, पापरी, ता. मोहोळ

``शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आम्ही दर देणार आहोत. त्यासंबंधी माहिती घेण्याचे काम सुरू आहे. काही खासगी दूध संघासह सहकारी दूध संघांना दूधदर देण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. त्याबाबत दुग्ध विभागाशी चर्चा सुरू आहे. शासनाच्या सुधारित निर्णयाची वाट पाहतो आहोत. त्या निर्णयानंतर लागलीच नव्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.``
- सतीश मुळे, व्यवस्थापकीय संचालक,
सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ, सोलापूर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर २५ रुपये वाढीव दर देण्याचा निर्णय शासनाने जाहीर करून आज दहा दिवसांचा कालावधी उलटला; पण सोलापूर जिल्ह्यातील दूध संघ आणि खासगी दूध संघांकडून टोलवाटोलवी सुरू आहे. शिवाय हा दर देण्यासाठीही एसएनएफ आणि फॅटच्या अटी आणि पुन्हा तो कसा द्यायचा, याबाबतही साशंकता असल्याने दूध उत्पादकांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी दूध उत्पादकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा दूध संघ आणि खासगी दूध संघाकडून जवळपास १२ लाख लिटरपर्यंतचे संकलन होते. शासनाकडूनच अद्याप आमच्याकडे दराविषयी काहीच आलेले नाही, त्यामुळे आम्ही दर देऊ शकत नाही, असे दूध संघांतर्फे सांगितले जात आहे. २० जुलै रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकातील त्रुटी दुरुस्ती करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दूध दर कसा द्यायचा, यावरच दुग्धविकास विभाग गोंधळात आहे. त्यामुळेही या प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे सांगण्यात येते. शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३.५ फॅट ते ८.५ एसएनएफ असणाऱ्या दुधालाच हा दर मिळणार आहे.

...तर कसा मिळेल दूधदर?
गाईच्या दुधातील सर्वसाधारण नैसर्गिक फॅटचे प्रमाण हे २.५ ते ४.५, एसएनएफचे प्रमाण हे ७.५ ते ८.७, प्रोटिनचे प्रमाण हे ३३.५ टक्के ते ३४.५० टक्क्यांपर्यंत असते. हे सर्व घटक गाईची जात, वय, वेताचे दिवस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाद्य या बाबींवर अवलंबून असतात. गाय कधीच ३.५ फॅट ते ८.५ एसएनएफ आणि ३४.५० टक्के अशा प्रकारे नैसर्गिकरीत्या दूध देत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार फॅट आणि एसएनएफचा विचार करता पुन्हा वाढीव दर मिळण्यात शेतकऱ्यांना अडचण येणार आहे.

 

इतर बातम्या
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
अकोला जिल्ह्यात दुष्काळस्थिती गंभीरअकोला : पावसातील खंडामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात कडधान्यांच्या आवकेत घटजळगाव : खानदेशात ज्वारीचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी...
खानदेशातील दुष्काळी स्थिती गंभीरजळगाव : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांमध्ये अल्प...
पाणीटंचाई टाळण्यासाठी ‘जलयुक्‍त`वर भर...यवतमाळ : जिल्ह्यात सरासरी समाधानकारक पाऊस झाला....
शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासारख्या...वर्धा : जिल्ह्यात लहान, मोठे मिळून १८० तलाव आहेत...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
नखातवाडी तलावातील पाणीसाठा जोत्याखालीपरभणी ः वाढते तापमान, जोराचे वारे, उपसा यामुळे...
रासायनिक खते, कीटकनाशके वापराविषयी...परभणी ः रासायनिक खते, कीटकनाशकांच्या असंतुलित...
सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी :...जाफराबाद, जि. जालना  : तालुक्‍यातील पीक...
पालखेडच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमकयेवला, जि. नाशिक : येवला तालुका सतत दुष्काळी...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
हरभरा लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शनऔरंगाबाद : कृषी विज्ञान मंडळाच्या...
सांगली जिल्ह्यात रब्बीची पेरणी संकटातसांगली : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पुरेसा झाला...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
चौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनकमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व...