agriculture news in Marathi, waiting for new guidelines for soil health testing, Maharashtra | Agrowon

माती नमुने तपासणीच्या नव्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

माती नमुने संकलनाची पद्धत मुळात योग्य वाटत नाही. एकच नमुन्याचे संकलन व त्याची चाचणी, तपासणी करून एकच आरोग्यपत्रिका १० शेतकऱ्यांना दिली जाते. यात काही शेतकरी आपल्या शेतात कमी रासायनिक खते वापरतात, अधिकचे शेणखत टाकतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन नमुने संकलनाची कार्यवाही व्हावी असे वाटते. 
- नाना पाटील, शेतकरी, पिंप्री खुर्द, ता. चाळीसगाव, जि. जळगाव

जळगाव ः नव्या वित्तीय वर्षासाठी माती नमुने संकलन, क्षेत्र मर्यादा व इतर मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. मागील वित्तीय वर्षाच्या तुलनेत नव्या वर्षाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये काहीसा बदल केला जाण्याची शक्‍यता असून, क्षेत्रमर्यादा बदलली जाईल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. 

२०१७-१८ मध्ये ज्या माती नमुन्यांचे संकलन झाले, त्यात बागायतीसाठी अडीच हेक्‍टर व कोरडवाहूसाठी १० हेक्‍टर याप्रमाणे माती नमुन्यांचे संकलन झाले. अर्थातच, अडीच हेक्‍टर बागायती क्षेत्रात जेवढे शेतकरी असतील, त्यांच्यासाठी एकच नमुना गृहीत धरून आरोग्यपत्रिकेचे वितरण झाले, तर कोरडवाहू जमीन क्षेत्रासाठी १० हेक्‍टरमध्ये जेवढे शेतकरी असतील त्यांच्यासाठी एकच माती नमुना संकलित करून या सर्वांना एकच जमीन आरोग्य पत्रिका देण्यात आली. 

२०१८-१९ या वित्तीय वर्षात एप्रिल महिन्यापासूून माती नमुन्यांचे संकलन व तपासणीला सुरवात होईल; परंतु या वर्षासाठी अजून माती नमुने संकलन, क्षेत्रमर्यादा याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. मागील वर्षी ६२ हजार ७४२ जमीन आरोग्यपत्रिका वितरणाचे उद्दिष्ट ठरले होते. यातील तीन हजार आरोग्यपत्रिकांते वितरण अजून झालेले नाही. तर २०१८-१९ या वर्षात सुमारे ६३ हजार जमीन आरोग्यपत्रिकांचे वितरण केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कृषी विकास योजनेच्या सूचना डब्यात
जमीन आरोग्यपत्रिका योजना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत माती नमुन्यांचे संकलन व तपासणी केली जात होती. कृषी सहायक माती नमुने संकलित करून ही तपासणी शासकीय प्रयोगशाळेत केली जायची. त्यात एका गावातील १० टक्के क्षेत्रातून माती नमुने संकलित केले जायचे ते वेगवेगळ्या भागात जाऊन संकलित करून पूर्ण गावातील शेतकऱ्यांसाठी या १० टक्के क्षेत्रातून घेतलेल्या माती नमुन्यांच्या आधारे तयार केलेल्या जमीन आरोग्यपत्रिकांचे वितरण केले जायचे; परंतु जमीन आरोग्यपत्रिका योजना लागू झाल्यानंतर हे १० टक्के जमिनीचे सूत्रही मागे टाकले आहे. 

प्रतिक्रिया
२०१८-१९ या वर्षात माती नमुने संकलनासंबंधी मार्गदर्शक सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या नाहीत. मागील वर्षातील तीन हजार माती नमुन्यांचे संकलन झाले आहे; परंतु काही तांत्रिक बाबींमुळे वितरण झालेले नाही. 
- सचिन बऱ्हाटे, जिल्हा मृदा सर्वेक्षण व चाचणी अधिकारी, जळगाव

 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...