agriculture news in marathi, Waiting for the purchase of soybean in the ground floor | Agrowon

हमीभावात सोयाबीन खरेदीची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

जळगाव : खानदेशात शासकीय खरेदी केंद्रात कडधान्य व सोयाबीन विक्रीसंबंधीच्या ऑनलाइन नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, सुमारे आठ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. खरेदीला विलंब होत असून, खरेदी केंद्राबाबत कार्यवाही सुरू करावी. सोयाबीनची खरेदीही लागलीच सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करीत असून त्यांना खरेदी केंद्रे सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

जळगाव : खानदेशात शासकीय खरेदी केंद्रात कडधान्य व सोयाबीन विक्रीसंबंधीच्या ऑनलाइन नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, सुमारे आठ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. खरेदीला विलंब होत असून, खरेदी केंद्राबाबत कार्यवाही सुरू करावी. सोयाबीनची खरेदीही लागलीच सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करीत असून त्यांना खरेदी केंद्रे सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

कडधान्याचे उत्पादन कमी आले. परंतु काळ्या कसदार जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादन मिळाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपले धान्य साठवून ठेवले आहे. त्यांनी निर्देशित शासकीय खरेदी केंद्रात ऑनलाइन नोंदणी करून घेतली आहे. ही नोंदणी अडखळत सुरू होती, यामुळे शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत होत्या. नोंदणीचे संदेश अनेक शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवर आले. आता खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

सोयाबीनच्या विक्रीसाठी सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ही नोंदणी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहील. सोयाबीन खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी तुळशीराम मराठे (पाचोरा) यांनी केली आहे.
शासकीय खरेदी सुरू होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बाजारात सध्या उडीद व मुगाला प्रतिक्विंटल ५१०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. तर सोयाबीनचे दरही ३२०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे शासनाने खरेदी केंद्रांना विलंब करू नये, असेही शेतकऱ्यांची मागणी आहे. 

आवक घटली
सध्या बाजारात कडधान्याची आवक कमी आहे. चोपडा, अमळनेर व पाचोरा वगळता इतरत्र किरकोळ आवक होत आहे. सोयाबीनची आवक मात्र चोपडा, अमळनेर व जळगाव बाजारात होत आहे, अशी माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...
सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ः...मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या...
‘सर्जा-राजा’ला माउलींच्या रथाचा मानमाळीनगर, जि. सोलापूर  : संत ज्ञानेश्‍वर...
पूर्णवेळ संचालकानेच लावले  `केम`...अमरावती  ः कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पातील...
तत्कालीन प्रकल्प अधिकारी ‘केम’...मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी...
कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका,...हवामान ः पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील...