सत्तेवर आल्यास गुजरातमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी ः राहुल गांधी
पीटीआय
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काहीच बोलत नाहीत. काळे धन आणण्यातही मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. सरकारने नोटाबंदीच्या माध्यमातून काळा पैसा सफेद केला व हा पैसा बड्या उद्योगपतींना दिला.
- राहुल गांधी, उपाध्यक्ष, कॉंग्रेस

सुरेंद्रनगर, गुजरात : शेतकरी हित लक्षात घेऊन कर्नाटक आणि पंजाब येथील कॉंग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. परिणामी उत्तर प्रदेशसारख्या भाजपशासित राज्यालाही आमच्या दबावामुळे कर्जमाफीची घोषणा करावी लागली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती आम्ही जागरूक असून सत्तेवर आल्यास गुजरातमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी (ता. २७) चोटीला येथे दिले.

गुजरातमध्ये राहुल यांचा तीन दिवसांचा दौरा सुरू आहे. बुधवारी चोटीला येथे राहुल यांनी ग्रामीण जनतेला संबोधित केले. राहुल म्हणाले, की विकासाला येथे काय झाले आहे. खरे तर विकासच वेडा झाला आहे. सरकारला शेतकरी आणि ग्रामीण जनतेशी काहीही देणेघेणे नाही. आम्ही कॉंग्रेसशासित राज्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी केली. तसेच इतर राज्यांमध्येही असा निर्णय व्हावा यासाठी सरकारवर दबाव तयार केला.

यामुळे उत्तर प्रदेशसारख्या भाजपशासित राज्यालाही कर्जमाफी करावी लागली. पंतप्रधान म्हणताहेत की हजारो कोटींचे गुंतवणूक करार केले आहेत. प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर याचा मागमूसही दिसत नाही. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. शेतकरी हितासाठी कॉंग्रेस शेतीविरोधी धोरणांचा कायम विरोध करणार असून निवडणुकानंतर सत्तेत आलो तर गुजरातमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू.

टि्वटरवरूनही हल्लाबोल
'लेडीज अँड जंटलमन, मी विमानाचा को-पायलेट आणि अर्थमंत्री बोलत आहे. कृपया आपला सीट बेल्ट घट्ट बांधून घ्या. जागेवर बसून राहा. कारण आपल्या विमानाचे पंख गळून पडले आहेत', अशा शब्दांत राहुल यांनी टि्वटरवरून हल्लाबोल केला आहे. बुधवारी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था ढासळत असल्याची टीका केली होती.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...