agriculture news in marathi, wall recharge scheme status, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात १०७५ विहीर पुनर्भरणाची कामे पूर्ण
टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 मे 2018
सातारा  : पाणीटंचाई, घटत्या भूजल पातळीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना वरदान ठरू पाहात आहे. जिल्ह्यात ‘रोहयो’तून विहीर पुनर्भरणाची तब्बल १५२३ कामे हाती घेण्यात आली. त्यातील १०७५ कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी एक कोटी २९ लाखांचा निधी अनुदान स्वरूपात प्राप्त झाला आहे. 
 
सातारा  : पाणीटंचाई, घटत्या भूजल पातळीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना वरदान ठरू पाहात आहे. जिल्ह्यात ‘रोहयो’तून विहीर पुनर्भरणाची तब्बल १५२३ कामे हाती घेण्यात आली. त्यातील १०७५ कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी एक कोटी २९ लाखांचा निधी अनुदान स्वरूपात प्राप्त झाला आहे. 
 
पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करणे, अखंड जलस्त्रोत निर्माण करणे तसेच भूजल पातळी वाढण्यासाठी रोजगार हमी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून, तसेच इतर शासकीय विभागांमार्फत महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनतंर्गत विहीर पुनर्भरणाच्या कामांवर भर दिला जात आहे. 
 
पाच एकरांच्या आतील शेतकऱ्यांना पुनर्भरणासाठी १२ ते १५ हजारांचे अनुदान मिळत आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी या अनुदानाकरिता जमिनीची अट नाही. जिल्ह्यात ‘रोहयो’तून विहीर पुनर्भरणाची एक हजार ५२३ कामे हाती घेण्यात आली. त्यातील एक हजार ७५ कामे पूर्ण झाली असून, त्यावर एक कोटी २९ लाखांचा निधी अनुदान स्वरूपात प्राप्त झाला आहे.
 
माण तालुक्‍यात सर्वाधिक ४६९ विहीर पुनर्भरणाची कामे मंजूर असून, त्यातील ४११ कामे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ खटावमध्ये ३७९ पैकी २५२ कामे पूर्ण आहेत. तसेच कोरेगाव १८४, वाई १४५, फलटणमध्ये १२४ कामे मंजूर आहेत. या योजनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत असल्याने विहीर पुनर्भरण कामास गती मिळाली आहे. या पुनर्भरणामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होण्याबरोबरच पाण्याची शुद्धता आणि जतन करणे सोपे होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...