गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले कूपनलिकेत

मी स्वत: गेल्या तीन वर्षांपासून हा कूपनलिका पुनर्भरणाचा प्रयोग करीत आहे. तीनशे ते साडेतीनशे फूट कूपनलिका काढून त्यात ओढ्याचे पाणी सोडले आहे. यामुळे मला खूप मोठा फायदा झाला आहे. माझी शेती बारमाही झाली आहे - कृष्णा आमटे, भडगाव, जि. कोल्हापूर
कुपनलिकेचे पुर्नभरण
कुपनलिकेचे पुर्नभरण

कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा पावसाळ्यात पुरेपूर वापर करून हे पाणी शेजारील कूपनलिकेत सोडून कूपनलिकेचे पुनर्भरण करण्याचे प्रयत्न भडगाव, चनेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथील शेतकऱ्यांनी सुरू केले. पावसाळ्याचे पाणी कूपनलिकेत सोडल्याने याचा फायदा उन्हाळ्यात होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी स्वत: खर्च करून ओढ्याकाठी कूपनलिकांची खोदाई केली आहे. यामुळे उन्हाळ्यातील भेडसावणारी पाण्याची चिंता दूर झाली आहे.

गडहिंग्लज शहराला लागून असलेल्या भडगाव, चनेकुप्पी गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई भासते. या भागात ओढे असले तरी पावसाळ्यातील पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्यात ओढे कोरडे असतात. यामुळे ओढ्यातील पाण्याचा उन्हाळ्यात फारसा फायदा होत नव्हता. दहा वर्षांपूर्वी काही शेतकऱ्यांनी ओढ्याचे पाणी एका पाटातून कूपनलिकेपर्यंत आणून ते कूपनलिकेत सोडण्यात आले.

पावसाळ्यामध्ये दोन ते तीन महिने हा प्रयोग करण्यात आला. यानंतर उन्हाळ्यात इतर कूपनलिका व विहिरींची पाणीपातळी कमी झाली नाही. उन्हाळ्यात कोरड्या असणाऱ्या कूपनलिकांना पाणी राहू लागले. हे पाहून अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग निवडला. याचा फायदा १५० ते २०० एकरांवरील क्षेत्राला झाला आहे.

हा प्रयोग यशस्वी होत असल्याने ओढ्याच्या काठावर शेत असलेल्या इतर शेतकऱ्यांनी ही स्वत: पैसे खर्च करून कूपनलिकांची खोदाई केली. अनेकांनी ओढ्याचे पाणी सोडण्यासाठीचा उद्देश ठेवून ओढ्यापासून पन्नास फुटांपर्यंत इतक्‍या जवळच्या अंतरावर कूपनलिका खोदल्या. ओढ्याला पाणी आले की थोडासा पाट करून ते पाणी कूपनलिका खुली करून त्यात सोडण्यात आले. ओढ्याला पाणी असेपर्यंत हे पाणी कूपनलिकेत जात असल्याने भूजलस्तरात वाढ झाली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com