agriculture news in Marathi, Want farmers husband but hardworking and not addicted, Maharashtra | Agrowon

नवरा शेतकरीच हवा... तो कष्टाळू, निर्व्यसनी हवा
राजकुमार चौगुले
सोमवार, 9 एप्रिल 2018

मी बी. ई. इलेक्ट्रिकल केले आहे; पण मी शेतकऱ्याशीच लग्न करणार आहे. शेतकऱ्याला वर्षाला कमी रक्कम मिळत असली तरी त्याच्याकडे असणारी संस्कराची शिदोरी ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तो जास्तीत जास्त उत्पादन घेणारा असावा एवढीच माझी अट आहे.
- श्वेता पाटील, बाहुबली, जि. कोल्हापूर

मलिकवाड, जि. बेळगाव (कर्नाटक) : माझं नाव...आहे. मी बी. कॉम झाले आहे. मला शेतकरी नवराच हवा. किमान ५ एकर तरी शेती हवी, तो प्रगतिशील आणि कष्टाळू हवा... त्याचे उत्पन्न चांगले हवे, तो निर्व्यसनी हवा... अशा अपेक्षांनी येथे ‘वर’ म्हणून फक्त शेतकरी मुलगा निवडीसाठी झालेला पहिला ऐतिहासिक शेतकरी वधू-वर मेळावा झाला.

महाराष्ट्र व कर्नाटकातील सुमारे ३८० मुलींनी शेतकरी ‘वर’ कसा असावा याबाबत अपेक्षा व्यक्त करत शेतकरी नवऱ्यासाठी पसंती दाखवली. येथील दिगंबर जैन मंदिराच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यासाठी दोन्ही राज्यांतील सुमारे ९५० इच्छुक शेतकरी वरांनी नोंदणी केली. एक एकरापासून शंभर एकर क्षेत्र असलेल्या मुलांनी यात सहभाग घेतला.

लग्नाच्या बाजारात शेतकरी वराला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा हा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला. श्री १००८ मुनीसुवृत्तनाथ जैन मंदिर, विराचार्य पतसंस्था बेडकिहाळ, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले. जैन समाजाने पुढाकार घेऊन हा मेळावा घेतला. एवढ्यावरच न थांबता जे अपंग, अनाथ, गरीब मुले मुली असतील, तर मंदिर कमिटी लग्नाचा सर्व खर्च करणार असल्याची घोषणा या वेळी मालिकवाड मंदिर कमिटीने या वेळी केली.

दीडशे वधू-वरांची प्राथमिक बोलणी
रविवारी सकाळी सुरू झालेला हा मेळावा सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होता. वधू-वर परिचयातून सुमारे दीडशे वधू-वरांनी प्राथमिक बोलणी जागीच करून लग्न ठरण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले. मेळाव्यासाठी संजय कुनुरे, श्रेणिक भेंडीकटगे, अशोक भेंडीकटगे, विजय चिंचवाडे, बाळासाहेब पाटील, महेंद्र पाटील, राजू पाटील, संजय पाटील, प्रवीण पाटील आदींनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया
आजच्या युगात लग्न करून बाहेर नोकरीला जायचे आणि आई वडिलांना तसेच त्यांच्या हलाखीच्या स्थितीत टाकून जायचे, अशी उदाहरणे आहेत. शेतकऱ्यांशी लग्न झालयास आई वडिलांची सेवाही करण्याचे संस्कार यातून घडू शकतात, हाही या मेळाव्यामागचा उद्देश आहे. आम्ही दोन्ही राज्यांतील ७२ गावांमध्ये महिला मंडळाची वधूवर जागृती बैठक घेतली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
- रावसाहेब कुनुरे, संयोजक

शेतकरी सुखी तर जग सुखी हे वाक्य मी माझ्या आयुष्यातही अमलात आणले आहे. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला लग्न ठरताना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. हे केवळ बोलून न दाखवता मी शेतकरी मुलाशी लग्न करून एक चांगला संदेश देणार आहे.
- प्राजक्ता बिरादर, कुपवाड, जि. सांगली

आज फक्त शेतकऱ्यांसाठी हा मेळावा घेऊन संयोजकांनी आमच्यासारख्या विवाह इच्छुक मुलांमध्ये एक नवा उत्साह आणला आहे.
- मयूर देसाई, नरंदे, जि. कोल्हापूर

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...