agriculture news in marathi, the ward structure program released for gram panchayat election, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात प्रभागरचना, आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017
शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील मार्च ते मे २०१८ यादरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करून येत्या ३ जानेवारी २०१८ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने प्रभागरचना व आरक्षणाला अंतिम मान्यता दिली जाणार आहे. 
 
शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील मार्च ते मे २०१८ यादरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करून येत्या ३ जानेवारी २०१८ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने प्रभागरचना व आरक्षणाला अंतिम मान्यता दिली जाणार आहे. 
 
राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०१७ अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया ऑक्‍टोबरमध्येच पूर्ण केली होती. यानंतर जिल्ह्यासह राज्यातील फेब्रुवारी २०१८ अखेर मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींसाठी मतदार याद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम सध्या हाती घेतला आहे. जिल्ह्यातील मार्च ते मे २०१८ यादरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून ६ नोव्हेंबरच्या आदेशानुसार प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. याबाबतची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना देण्यात आली आहे. 
 
निवडणुका होत असलेल्या गावांची येत्या २० नोव्हेंबरपर्यंत तहसीलदारांच्या वतीने प्रारूप प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत विशेष ग्रामसभा बोलावून प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे. तसेच प्रभागनिहाय आरक्षण काढले जाणार आहे. याबाबतची मांडणी करून ४ डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने त्याची तपासणी केली जाणार आहे. यात काही दुरुस्ती असल्यास तसा आदेश दिला जाणार आहे.
 
त्यानंतर ६ डिसेंबरपर्यंत या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सर्व समिती सदस्यांच्या स्वाक्षऱ्या त्यावर केल्या जाणार आहेत. त्यानंतर नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यासाठी तहसीलदारांच्या वतीने प्रभागरचना व आरक्षण यांची ८ डिसेंबरपर्यंत गावोगावी प्रसिद्धी केली जाणार आहेत. त्यावर नागरिकांना १५ डिसेंबरपर्यंत तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात हरकती दाखल करता येणार आहेत.
 
तहसीलदारांकडे प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी १८ डिसेंबरपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविल्या जाणार आहेत. या हरकतींवर २७ डिसेंबपर्यंत सुनावणी होणार आहे. प्रत्येक हरकती व सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्रायासह प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे. यानंतर ३ जानेवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने प्रभागरचना व आरक्षणाला अंतिम मान्यता दिली जाणार आहे.
 
या अंतिम मान्यतेनंतर प्रभागरचना व आरक्षणाला ८ जानेवारीला प्रसिद्धी दिली जाणार आहे. प्रभागरचनेत निश्‍चित केलेल्या सीमानुसार गावच्या मतदार याद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम जानेवारी अखेरपर्यंत जाहीर केला जाणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...
कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...
'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...
वीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...
सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...
नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...
शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...
शेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
अण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...