agriculture news in Marathi, warkari is main-point of Pandharpur development, Maharashtra | Agrowon

वारकरी केंद्रबिंदू मानून पंढरपूरच्या विकासास प्राधान्य ः चंद्रकांत पाटील
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

पंढरपूर, जि. सोलापूर  ः पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने येणाऱ्या वारकरी-भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. राज्य शासन वारकरी केंद्र बिंदू मानून पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळांचा विकास करत अाहे, अशी माहिती महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.

पंढरपूर, जि. सोलापूर  ः पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने येणाऱ्या वारकरी-भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. राज्य शासन वारकरी केंद्र बिंदू मानून पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळांचा विकास करत अाहे, अशी माहिती महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.

कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेसाठी महसूलमंत्री पाटील पंढरपूर येथे आले असून, त्यांनी या वेळी पंढरपुरातील विविध मठांना भेटी दिल्या. त्या प्रसंगी मठातील महाराज, वारकरी, फडकरी यांच्या संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, आमदार प्रशांत परिचार, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, शेखर चरेगावकर, श्रीकांत भारतीय, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व वारकरी-भाविक उपस्थित होते.

महसूलमंत्री पाटील यांनी पंढपुरातील मच्छिंद्र महाराज मठ, मारुती बुवा कराडकर मठ, देहूकर महाराज मठ, तात्यासाहेब वासकर महाराज मठ, आप्पासाहेब वासकर महाराज मठ, यादव महाराज मठ यासह अन्य मठांना भेटी देऊन मठातील महाराजांकडून वारी, वारकऱ्यांच्या समस्या याबाबत चर्चा केली. या वेळी महसूलमंत्री पाटील म्हणाले, की मठ आणि परिसरात असणाऱ्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल.

पंढरपुरातील स्वच्छता, चंद्रभागा नदीपात्राची स्वच्छता ही कामे प्राधान्याने केली जातील. या वेळी मठातील महाराज मंडळींनी आपआपल्या समस्या महसूलमंत्र्यांना सांगितल्या. या समस्यांचे निराकरण करण्यात प्राधान्य देण्यात येईल, असे महसूलमंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...