agriculture news in marathi, Warna factory will give Rs. 2,900 per tonne of sugarcane | Agrowon

वारणा कारखाना उसाला प्रतिटन २९०० रुपये दर देणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

वारणानगर, जि. कोल्हापूर ः येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यात हंगामात गळीत झालेल्या उसास प्रतिटन २९०० रुपये देणार, सातत्याने ऊस पुरवठा करणारे व संयुक्त शेअर्स असलेल्यांना निकषानुसार स्वतंत्र सभासदत्व देणार, वारणेस शंभर टक्के ऊस घालणाऱ्या गावातील सर्व पाणंद रस्ते कारखान्यामार्फत करणार असल्याची घोषणा वारणा समूहाचे नेते डॉ. विनय कोरे यांनी येथे केली.

वारणानगर, जि. कोल्हापूर ः येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यात हंगामात गळीत झालेल्या उसास प्रतिटन २९०० रुपये देणार, सातत्याने ऊस पुरवठा करणारे व संयुक्त शेअर्स असलेल्यांना निकषानुसार स्वतंत्र सभासदत्व देणार, वारणेस शंभर टक्के ऊस घालणाऱ्या गावातील सर्व पाणंद रस्ते कारखान्यामार्फत करणार असल्याची घोषणा वारणा समूहाचे नेते डॉ. विनय कोरे यांनी येथे केली.

येथील वारणा सहकारी साखर कारखान्याची ६२ वी वार्षिक सभा झाली. या वेळी डॉ. कोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्षा शोभाताई कोरे होत्या.
या वेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी, कारखान्याचे सर्व संचालक, एक्‍झिक्‍युटीव्ह डायरेक्‍टर व्ही. एस. चव्हाण, कायदेशीर सल्लागार ॲड. शिवाजीराव चव्हाण, ॲड. एन. आर. पाटील, ॲड. जी. जी. नानीवडेकर, बॅंक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक विमलकुमार यांच्यासह वारणा समूहातील पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. प्रा. पी. बी. बंडगर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी आभार मानले.
प्रभारी कार्यकारी संचालक विजयकुमार कोले यांनी विषयवाचन केले. सर्व विषय सभासदांनी मंजूर केले.

प्रशासकीय अधिकारी दादासाहेब जाधव यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. पुणे येथील व्ही. एस. आयचा (कै.) वसंतराव नाईक ऊसभूषण पुरस्कारप्राप्त सभासद श्रीमती सुशिला बाबासाहेब पाटील (ऐतवडे खुर्द, ता. वाळवा), भारतीय शुगर आदर्श ऊस उत्पादक पुरस्कारप्राप्त आनंदराव ईश्‍वरा पाटील (तांदुळवाडी), वारणा कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे यांना गडहिंग्लज येथील श्रीमती रत्नमाला घाळी समाजभूषण पुरस्कार मिळालेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

कमी गाळप झाल्याने अडचणी कमी
गत हंगामात वारणाचे १० लाख ८१ हजार टन उसाचे गाळप, उतारा १२.७ तर १३ लाख २६ हजार साखरेची पोती झाले. देशातच साखरेचे प्रचंड उत्पादन झाल्याने कारखान्यांने संकट आले. वारणेचे कमी गाळप झाल्याने अडचणींही कमी झाल्या.

इतर बातम्या
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
यंदा पाऊस, पीकपाणी समाधानकारक :...सोलापूर  ः यंदा पावसाचे प्रमाण पुरेसे राहील...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...