agriculture news in Marathi, warning of agitation front of agri minister, Maharashtra | Agrowon

कृषिमंत्र्यांच्या घरासमोर उपोषणाचा इशारा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

परभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना २०१७-१८ च्या हंगामातील सोयाबीनची पीकविमा नुकसानभरपाई तत्काळ देण्यात यावी, अन्यथा अखिल भारतीय किसान सभेतर्फे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानासमोर शुक्रवारपासून (ता.१५) बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सचिव काॅम्रेड विलास बाबर यांनी दिला आहे. 

परभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना २०१७-१८ च्या हंगामातील सोयाबीनची पीकविमा नुकसानभरपाई तत्काळ देण्यात यावी, अन्यथा अखिल भारतीय किसान सभेतर्फे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानासमोर शुक्रवारपासून (ता.१५) बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सचिव काॅम्रेड विलास बाबर यांनी दिला आहे. 

२०१७ च्या हंगामात परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे ८० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले होते, परंतु रिलायन्स जनरल इन्सुरन्स विमा कंपनीने परभणी तालुक्यातील ५५ हजार ३८२ हेक्टरवरील विमासंरक्षित सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई दिलेली नाही.

सोयाबीनचा पीकविमा परतावाप्रश्नी वारंवार आंदोलन करून निवेदने देण्यात आली. मंत्रालयामध्ये १० आॅक्टोबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु चार महिन्यांचा कालावधी उलटला तरी विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही. तत्काळ पीकविमा नुकसानभरपाई न दिल्यास शुक्रवारपासून (ता.१५) कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानासमोर शेतकरी बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशारा कॅाम्रेड विलास बाबर यांनी दिला आहे.

इतर बातम्या
जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा...जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा...
खानदेशातील पाणीटंचाई गंभीरजळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
खानदेशात अनियमित वीजपुरवठाजळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे....
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
नाशिक येथे साकारणार 'देवराई' नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...