वाशीममध्ये सुधारित हंगामी पैसेवारी ५४ पैसे

वाशीममध्ये सुधारित हंगामी पैसेवारी ५४ पैसे

वाशीम : खरीप हंगामाकरिता जिल्ह्याची सुधारित हंगामी पैसेवारी ५४ पैसे जाहीर करण्यात आली अाहे. यात वाशीम तालुक्यातील १३१ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५५ पैसे, मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची पैसेवारी ५६ पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची पैसेवारी ५४ पैसे, मंगरुळपीर तालुक्यातील १३७ गावांची ५४ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची ५२ पैसे, तर मानोरा तालुक्यातील १३६ गावांची ५२ पैसे इतकी पैसेवारी निश्चित करण्यात आली आहे. या जिल्ह्यातील ७९३ महसुली गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा अधिक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

पैसेवारीला शिवसेनेचा विरोध या वर्षी शेतमालाचे घसरलेले दर, घटलेले पर्जन्यमान आणि त्यामुळे खरीप हंगामातील शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट आलेली अाहे. या सर्व बाबी दुर्लक्षित ठरवत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक अर्थात सरासरी ५४ पैसे जाहीर केली आहे. वाशीम तालुक्यातील पैसेवारी ५५ असून, ही पैसेवारी ५० पैशांच्या आत घोषित करण्याची मागणी शिवसेना तालुका शाखेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. या तालुक्यात कमी पावसामुळे सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे. कमी पावसामुळे यंदा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन पिकाचे उत्पादन झाले नाही. अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनचे एकरी उत्पादन अत्यल्प झाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने तालुक्यातील पिकांची पैसेवारी ५० पैशांच्या आत घोषित करण्याची मागणी करण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com