agriculture news in marathi, waste based energy generation project in market committee, pune, maharashtra | Agrowon

बाजार समित्यांमध्ये कचऱ्यावर आधारित ऊर्जानिर्मिती प्रकल्प
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

५० टनांपर्यंत कचरा निर्माण हाेणाऱ्या बाजार समित्यांमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वर्षाला किमान दाेन काेटी रुपयांपर्यंत खर्च येत आहे. हा खर्च कमी करून गॅस आणि ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारल्यास कचऱ्याचा प्रश्‍नदेखील संपेल. याबराेबरच बाजार समित्यांचा विजेसाठी हाेणारा खर्च कमी हाेईल. अतिरिक्त वीज किंवा गॅस विक्रीतून उत्पन्न देखील मिळेल. यासाठी पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार विविध बाजार समित्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
- सुनील पवार, कार्यकारी संचालक, पणन मंडळ, पुणे.

पुणे   ः शहरांत तसेच बाजार समित्यांमधील कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करून वायु आणि ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत यासाठी पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार पणन मंडळाच्या वतीने कचऱ्यावर प्रक्रिया आणि ऊर्जानिर्मिती करणाऱ्या संस्थेने बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना ‘पणन’च्या संचालक मंडळाच्या बैठकीदरम्यान शुक्रवारी (ता. २८) सादरीकरण केले. या वेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक दीपक शिंदे उपस्थित हाेते.   

बाजार समित्यांमधील कचऱ्यावर प्रक्रिया करून गॅस आणि ऊर्जानिर्मितीसाठी पणन मंडळाने पुढाकार घेतला आहे. गॅस आणि वीजनिर्मितीमधून बाजार समित्या स्वयंपूर्ण झाल्यास विजेसाठी हाेणारा लाखाे रुपयांचा खर्च कमी करून, अतिरिक्त वीज विक्री करता येणार आहे. यामुळे बाजार समित्यांना अतिरिक्त उत्पन्नदेखील मिळवणे शक्य हाेणार आहे. ऊर्जा प्रकल्पाबाबत एन्प्राेटेक साेल्युशनचे संजय नांद्रे यांनी विविध क्षमतेच्या प्रकल्प आराखड्यांचे सादरीकरण केले.

या वेळी दरराेज ५० टन आेला कचरानिर्मिती हाेणाऱ्या बाजार समित्यांमध्ये प्रकल्प उभारणे शक्य आहे. ५० टन कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी १५ काेटी रुपये खर्च अपेक्षित असून, यासाठी एक एकर जागेची आवश्यकता असेल. हा प्रकल्प संबंधित कंपनी १० वर्षांपर्यंत चालविणार असून, ७ ते ८ वर्षांमध्ये प्रकल्पाची किंमत वसूल हाेण्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला.

या प्रकारचे प्रकल्प शिर्डी देवस्थान, काेल्हापूर, पुणे येथे उभारण्यात आले असून ते यशस्वीरित्या सुरू अाहेत. या प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी एक काेटी रुपयांपर्यंत अनुदान मिळणार असल्याचेही नांद्रे यांनी सांगितले.
 

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...