agriculture news in marathi, water balance declered in hiwrebazar, nagar, maharashtra | Agrowon

हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंद
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

नगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये नवरात्रोत्सवानिमित्ताने मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला. यावर्षी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला असून, गेल्या वर्षीपेक्षा २८६ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता पाहता नवरात्रीचा मुहूर्त साधत आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी त्यांच्या हिवरेबाजार गावातील उपलब्ध पाण्याचा ताळेबंद मांडत गावातील पाण्याचे पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन केले.

नगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये नवरात्रोत्सवानिमित्ताने मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला. यावर्षी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला असून, गेल्या वर्षीपेक्षा २८६ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता पाहता नवरात्रीचा मुहूर्त साधत आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी त्यांच्या हिवरेबाजार गावातील उपलब्ध पाण्याचा ताळेबंद मांडत गावातील पाण्याचे पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन केले.

हिवरेबाजारमध्ये दर वर्षी पडणाऱ्या एकूण पावसाच्या आधारे पाण्याच्या वापरासाठी पाण्याचा ताळेबंद ग्रामसभेत मांडण्यात आला. ग्रामस्थांशी चर्चा करताना पोपटराव पवार म्हणाले, की दर वर्षीपेक्षा यावेळेस वेगळ्या पद्धतीने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्याने आपल्याला पिकांऐवजी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी, उपलब्ध फळबागांसाठी लागणारे पाणी ठिबकचा जास्तीत जास्त वापर केला तर आपण केलेल्या पाण्याच्या ताळेबंदानुसार आपल्याला अडचण येणार नाही; अन्यथा पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते, असे पोपटराव पवार यांनी सांगितले. या वेळी या विशेष ग्रामसभेस दिल्लीवरून आलेले नॅशनल लेव्हल मॉनिटरिंग (एनएलएम)चे अधिकारी नीरव त्रिवेदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...